Maharashtra Politics : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत (Kurla Assembly Election) ठाकरे गटातली (Thackeray Group) धुसफूस चव्हाट्यावर आलीय. नाराज पदाधिकाऱ्यांना डावलून ठाकरे गटाकडून कुर्ला विधानसभेत आज नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या कुर्ला विधानसभेत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कुर्ला विधानसभेत विधानसभा प्रमुखपद निर्माण केल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते, नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे जवळपास 18 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता. 


काही दिवसांपूर्वी कुर्ला विधानसभेतील 18 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की, काही नेते आहेत. ते नियुक्त्या आम्हाला विश्वासात घेऊन करत नाहीत, अशी खंत व्यक्त करत त्यांनी आपले राजीनामे दिले होते. अशातच आज सामना वृत्तपत्रात कुर्ला विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या कुर्ला विधानसभेत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 


नेमकं काय झालेलं? 


कुर्ला विधानसभेत विधानसभा प्रमुख पद निर्माण केल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते, नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे जवळपास 18 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता. यामध्ये विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखा प्रमुख यांचा समावेश होता. यापैकी विभागाप्रमुख वगळून इतर नियुक्त्या आज ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांनी 4 ऑगस्टला आपले राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. 


जाहीर झालेल्या नव्या नियुक्त्या 



  • विधानसभा संघटकपदी किसन मदने (शाखा क्र. 149, 151, 167, 168, 169, 170, 171)

  • विधानसभा समन्वयक बळीराम उतेकर (शाखा क्र. 149, 151, 169)

  • मुकुंद चव्हाण (शाखा क्र. 167, 168)

  • मोहन तावडे (शाखा क्र. 170, 171)

  • उपविभागप्रमुख सचिन उमरोटकर (शाखा क्र. 149, 151, 169)

  • समीर हिरडेकर (शाखा क्र. 167, 168)

  • अनंत गांधी (शाखा क्र. 170, 171)

  • शाखाप्रमुख - विशाल बिलये (शाखा क्र. 149)

  • पंढरीनाथ आंबेडकर (शाखा क्र. 151)

  • फारुख गोलंदाज (शाखा क्र. 167)

  • विशाल मांढरे (शाखा क्र. 168)

  • प्रदीप चौघुले (शाखा क्र. 169)

  • मलकितसिंह संधू (शाखा क्र. 170)

  • प्रकाश साळुंके (शाखा क्र. 171)