Dhananjay Munde on Banjara ST Reservation: आज बंजारा समाजाला तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गाचे आरक्षण आहे. आम्हीसुद्धा तिकडे एसटी प्रवर्गातच आहोत. बंजारा आणि वंजारा (vanjari community) वेगवेगळे आहेत का, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी सोमवारच्या बंजारा समाजाच्या मोर्चावेळी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी बंजारा (Banjara Community) समाजाने केली आहे. वंजारी आणि बंजारा समाज एक नाहीत, असे बंजारा समाजाकडून ठामपणे सांगण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्या कालच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळीही घोषणाबाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याला मान्यता दिली होती. हैदराबाद गॅझेटमध्ये (Hyderabad gazette) बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्यामुळे आता बंजारा समाजाला महाराष्ट्रातही एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, अशातच धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने वादाची नवी ठिणगी पडली आहे. 

Continues below advertisement

सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती (अ) (VJ-A) प्रवर्गाचे आरक्षण आहे. तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमाती (NT-D) या प्रवर्गाचे आरक्षण आहे. यासंदर्भात बोलताना हरीभाऊ राठोड यांनी म्हटले की, धनगर समाजाला आज भटक्या विमुक्त प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्यासाठी मी पुढाकार घेतला होता. वंजारी आणि बंजारा समाज वेगवेगळे आहेत. मी गोपीनाथ मुंडे यांचा स्वीय सहाय्यक असतानाही हीच भूमिका घेतली होती. मी साहेबांना सांगितलं होतं की, तुम्ही यामध्ये पडायचे नाही. तुम्हालाही माहिती आहे की, लमाण आणि वंजारी यांच्यात फरक आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यासंदर्भात बंजारा समाजातील तरुणांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच तुम्ही आमच्या ताटातील अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी त्यांचं वाक्य मागे घ्यावे. बंजारा आणि वंजारी समाजाची भाषा, रुढी, परंपरा, वेशभुषा सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. दोन्ही समाजांमध्ये काहीच जुळत नाही. पण धनंजय मुंडे यांनी या सगळ्याला वेगळे वळण लावण्याचे काम केले, असे बंजारा समाजातील तरुणांनी म्हटले.

Continues below advertisement

Dhananjay Munde: धनंजय मुंडे काय म्हणाले?

कोणी काय विरोध करावा, हे माझ्या हातात नाही. स्थानिक पातळीवर आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना आणि वागताना, वंजारा आणि बंजारा ही जात वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून, बंजारा समाजाने मुंडे साहेबांवर प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे. त्या बोलण्याचा कोणी काय अर्थ घ्यावा. अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे कोण होते, हे सुद्धा सोशल मीडियावर समोर आले आहे. कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं, काहीतरी झालं पाहिजे ना, अशी काही विघ्नसंतोषी लोकं आहेत, ते हे सगळे प्रकार करत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

जारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी