Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) आज(9 मार्च) 3 महिने पूर्ण झाले आहेत.  दिवंगत सरपंच देशमुख यांना करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी चार मार्चला मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धसांसह (Suresh Dhas) अनेकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 


आशातच, धनंजय मुंडे यांनी एक पोस्ट शेयर करत त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावत सज्जड दम दिला आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य असल्याचे धनंजय मुंडे म्हणालेय. सोबतच राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.


नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?


परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले. माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केल्या गेले.


मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.


राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे. सोबतच राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत असल्याची खंतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  


हे ही वाचा