Dhairyasheel Mohite Patil on Ajit Pawar Group : माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात मोठा मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवार गटाबाबत भाष्य केलं आहे. "लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन माझा दणदणीत विजय करून दिला. विजय झाल्यानंतर आज शरद पवार यांना मी भेटायला आलेलो आहे. अजित पवार गटाला घ्यायचं की नाही ते शरद पवार ठरवतील", असं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते.
माझ्या विरोधामध्ये सगळ्यांनीच मोठी ताकद लावलेली होती
अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, माझ्या विरोधामध्ये सगळ्यांनीच मोठी ताकद लावलेली होती. मात्र मायबाप जनतेने मला निवडून दिलं. धमक्या देऊन लोक घाबरली नाहीत. शरद पवार म्हणाले होते की, निवडणुकीनंतर काही पक्षांची, लोकांची धावपळ पळापळ होईल. त्याप्रमाणे आता अजित पवार गटाच्या अनेक बैठका होत आहेत. धावपळ करताना दिसत आहेत. मी परत आलो ते दोन पक्ष फोडूनच आलो इथून ते मला सरकारमधून मुक्त करा हा प्रवास लोकांनी लक्षात ठेवून जागा दाखवली, असा टोलाही अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचा गट घरवापसी करणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
अजित पवार गटासाठी दार उघडी ठेवायची की नाही हा शरद पवारांचा प्रश्न आहे
पुढे बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, अजित पवार गटासाठी दार उघडी ठेवायची की नाही हा शरद पवारांचा प्रश्न आहे. मात्र कोणीही नेता नसताना लोक लढले. भाजपने दहा वर्षात जे केलेला आहे ते लोकांना माहित आहे. एकदा काचेला तडा गेला की पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग नसतो. त्यामुळे फुटलेली काच ती फुटलेली असते. तसा मित्र पक्षांना त्यांनी केललं आहे, असंही अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या