Devendra Fadnavis and Eknath Shinde Press conference, नागपूर : नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी वाल्मिक कराडला अटक होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी याबाबत उत्तर दिलं आहे. "मी कालही सांगितलं की, कोणालाही सोडलं जाणार नाही. पोलीस सगळ्यांचा मागोवा घेत आहेत. सर्वांना अटक होईल", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात आम्ही मागास भागात परिवर्तन केलंय. पुढील रोडमॅप देखील आम्ही विधानसभेत मांडला आहे. महाराष्ट्रातील मागास भागावर आमचा फोकस आहे. नदीजोड आणि सिंचनावर प्रकल्पांवर आमचा भर असेल. कापसाचा बोनस आपण जाहीर केलाय. सोयाबीनची खरेदी हमीभावाने रेकॉर्डब्रेक खरेदी आपण केली आहे. विदर्भ मराठवाड्यातील पिकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे. 


धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर 20 हजार बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला : एकनाथ शिंदे 


एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरु केली. या योजना जशा आहेत, तशा सुरु राहतील. राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भातील अनेक प्रकल्पांना न्याय दिला आहे. यापुढे देत राहणार आहोत. नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर 20 हजार बोनस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्‍यांनी घेतलाय. महाराष्ट्र न थांबता पुढे जाणार आहे. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांच्या मांडलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर दिलं. मंत्रिमंडळ विस्तार झालाय. विधान परिषदेच्या सभापतींची नियुक्ती झाली. 


लोकांनी शिव्या श्याप देणाऱ्या लोकांना घरी बसवलं - एकनाथ शिंदे 


आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला मान सन्मान दिलाय. यापूर्वी अडीच वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करुन आरोप केले. आम्ही त्यांना कामाने उत्तर दिलं. आम्ही सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे निर्णय घेतले. आम्ही टीम वर्क केलं. त्यामुळेच लोकांनी शिव्या श्याप देणाऱ्या लोकांना घरी बसवलं. त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून काम करणार आहोत. विदर्भात देखील मागील अडीच वर्षात अनेक सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली होती. हे सरकार बळीराजाचं आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलं, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...