मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या (BJP) नेत्यांना दिला आहे. मुंबईतल्या सागर निवासस्थानी गुरुवारी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाजपच्या नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. गणपती बाप्पाच्या प्रसादासोबतच फडणवीसांनी आपल्या नेत्यांना कानमंत्रही दिला.
 
सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, अंतिम टप्प्यातली कामं मार्गी लावा अशा सूचना फडणवीसांनी आमदारांना केल्या आहेत. महायुतीतल्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांना दिला. मुंबईतल्या सागर निवासस्थानी आज फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. गणपती बाप्पाच्या प्रसादासोबतच फडणवीसांनी आपल्या नेत्यांना कानमंत्रही दिला.


सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह इतर प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, अंतिम टप्प्यातली कामं मार्गी लावा अशा सूचना फडणवीसांनी आमदारांना केल्या आहेत. 


"लागेल त्या" मदतीसाठी मी उभा आहे: देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांचे विचारमंथन झाले. फडणवीसांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजप आमदार, खासदार व मंत्र्यांची रीघ लागली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. 


लाडक्या बहीण योजनेसह सरकारच्या  प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, अधिकाधिक वेळ मतदार संघात द्या, ही यशाची त्रिसूत्री फडणवीसांनी भाजप नेत्यांना सांगितली. तसेच आपापल्या मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा. "लागेल त्या" मदतीसाठी मी उभा आहे, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना दिले.


अंतर्गत सर्व्हेत भाजपला धक्का


भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला 25 जागा मिळत असल्याचे पुढे आले आहे.त्यात भाजप 18 जागा , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातूल 62 पैकी 39 आमदार आहेत. नागपूर जिल्ह्यात 12 पैकी भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. 2019 मध्ये 7 आमदार भाजप महायुतीकडे  होते. भारतीय जनता पक्षाला विदर्भात 62 पैकी 2014 मध्ये 42 व 2019 मध्ये 29 जागा होत्या. राष्ट्रवादी 2019 मध्ये 5 आमदार निवडून आले त्यात चार अजित पवार गटाकडे आहेत. शिवसेनेने 2019 मध्ये 3 जागा जिंकल्या होत्या व 3 अपक्षांची शिंदे शिवसेनेला साथ होती. त्यामुळे विदर्भात शिंदे शिवसेनेकडे 6 आमदार आहेत.


आणखी वाचा


नितेश राणे म्हणाले, फक्त हिंदूंशीच व्यवहार करा; मुस्लिमांबद्दलची वक्तव्यं खपवून घेणार नाही, अजितदादांचा थेट इशारा