नागपूर:  एखादा व्यक्ती रोज बडबड करत असेल त्याला रोज उत्तर देता येत नाही.   वारंवार बडबड करणा-यांची जागा कुठे असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही, अशी  टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)  नाव न घेता केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din)  निमित्ताने नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला . यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले,  आजचा दिवस समृद्ध भारतासाठी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य काय असते याची शिकवण दिली. स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा  कणा महाराष्ट्र आहे. 


देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा : देवेंद्र फडणवीस 


देशाचा पावर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.  देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं.  देशातील वीस टक्के उत्पादन महाराष्ट्र करतं. देशात सर्वाधिक निर्यात करणारा राज्य महाराष्ट्र आहे.  सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. नागपुरचा विकास होत आहे. नागपुरात सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. भविष्यात नागपूर देशाचा लॉजिस्टिक हब बनेल अशा पद्धतीने तयारी महाराष्ट्र सरकार करत आहे.


महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात पथसंचलन 


महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात पथसंचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस दल, नागपूर शहर पोलिसांचे पुरुष आणि महिला तुकड्या, वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजना च्या तुकड्या तसेच अग्निशमन दल या पथसंचलनात सहभागी झाले होते.  


काय म्हणाले उद्धव ठाकरे?


पुण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली.  भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. टरबुजाला घोडे नाही, हातगाडी लागते, असे  उद्धव ठाकरे म्हणाले होते. जय भवानीच महत्व काय कळणार. धाराशिवला गेले पणं तुळजाभवानी मंदिरात गेले नाही, देवेंद्र फडणवीस पण आतापर्यंत तुळजाभवानीच्या मंदिरात गेले नाहीत.  400 पार म्हटल्यावर लोक आज तडीपार म्हणत आहेत. यांना देशाची घटना बदलायची आहे. इंडिया आघाडीचे 300 च्या वर खासदार निवडून येणारच, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


हे ही वाचा :


Thane Lok Sabha Election 2024: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात


Video :