Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case ) यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. अनेक दिवस उलटून देखील देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये आज (दि.28) सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी केली. दरम्यान, आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. 


बीड प्रकरणात दोन मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  
बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे. 


संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा, बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा 


दरम्यान, बीडमध्या सर्व पक्षीय नेत्यांकडून संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, भाजप आमदार सुरेश धस, शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातूनही या मोर्चात लोकांनी सहभाग नोंदवला होता. 


म्होरक्या खंडणीत दोषी असल्याचे मुख्यमंत्री म्हणताय, मग अजून अटक का झाली नाही? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल 


धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी सांगितलेलं होतं.  जरं धनंजय मुंडेला पालकमंत्री पद दिलं तर छत्रपती घराणे या जिल्ह्याचे पालकत्व घेणार आहे. बीडचा बिहार करायचा का? आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.  19 दिवस झाले आरोपी सापडत नाहीत.  तीन आरोपी सापडत नाही, आणि त्यांच्या म्होरक्या बिनधास्त पोस्ट टाकतोय की मी दर्शनाला गेलोय.  मुख्यमंत्री तुम्ही कसं चालवून घेताय.  तुम्ही एसआटी लावणार होतात. हा म्होरक्या खंडणीत दोषी असल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग अजून अटक का झाली नाही?  पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडेचे पान वाल्मिकी शिवाय पान हलत नाही. धनंजय मुंडे म्हणतात की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.  मग ह्या मंत्र्यांनी अटक करण्याची जबाबदारी का घेतली नाही? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय.


इतर महत्त्वाच्या बातम्या  


Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश