Devendra Fadnavis & Eknath Shinde : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या (Central Government) धर्तीवर नीती आयोगासारखा (Niti Aayog) आयोग स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र असे त्याचे नाव आहे. 'मित्र'च्या (Mitra) उपाध्यक्षपदी अजय अशर (Ajay Asher) या बिल्डरची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मोठा धक्का दिलाय. अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवण्यात आले आहे.
बिल्डर अजय अशर हे ठाण्यातील बडे प्रस्थ असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघ किसननगर येथे त्यांनी अनेक बांधल्या आहेत. अशर हे काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे मित्र होते. मात्र 2000 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले. शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदे सभागृह नेतेपदी पोहोचले, त्यावेळी अशर यांनी शिंदेंसोबत जवळीक साधली होती. शिंदे आमदार झाल्यानंतर ही जवळीक घट्ट मैत्रीमध्ये बदलली. त्यानंतर ठाण्यातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प असो वा रिडेव्हलपिंगचे प्रोजेक्ट असो अशर यांना प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली. तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती केली होती.
'या' नेत्यांची नव्याने नियुक्ती
आता महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय फडणवीस सरकारने बदलले आहेत. आता फडणवीस सरकारने आणखी एक निर्णय बदलून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिलाय. अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवण्यात आले आहे. तर, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil), राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची नव्याने उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. तसेच मुख्य सचिव यांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या