Devendra Fadnavis on Vaishnavi Hagawane Death Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) हे दोघे फरार होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आत्महत्या करायला प्रेरित करणे, या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. त्यांच्यावर कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती सर्व कारवाई केली जाईल. एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये फरक करणे हे चुकीचे आहे, अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे, असे त्यांनी म्हटले. 

हगवणे कुटुंबीयांवर मकोका लागणार? 

आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी कस्पटे कुटुंबीयांनी मागणी केली आहे. याबाबत ते तुमची भेट घेणार असल्याचे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोका लागू शकेल. पण, ते त्या नियमात बसेल की नाही, यासंदर्भात आज सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  

Continues below advertisement

अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का? असे वक्तव्य केले. त्यामुळे या प्रकरणावर अजित पवार हे गंभीर नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित दादा गंभीर नाही, असे नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश इतकाच होता की, कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा कोणाकडेही लग्नाला बोलावलं तरी आपण जातो.  त्यावेळी आपल्याला कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे? इतकंच सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केल्याची प्रतिक्रिया   त्यांनी दिली. 

पोलिसांनी उचित कारवाई केली

राजेंद्र हगवणे आणि सोशल हगवणेच्या अटकेपूर्वी ते बिर्याणी खात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी त्यांना पकडलेले आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. यापुढेही पोलीस कारवाई करतील. आता याला खूप फाटे फोडणे, हे अतिशय चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Anjali Damania on Ajit Pawar : अजितदादा म्हणाले, केवळ लग्नाला गेलो म्हणून माझ्या मागे लचांड लागलं, आता अंजली दमानियांकडून खरपूस समाचार; म्हणाल्या, त्यांनी...