Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad मुंबई: वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला. आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला.

Continues below advertisement

आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं. पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील उत्तर दिलं आहे. 

अनिल परब आक्रमक; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा...अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. तसेच एका आमदाराने कसं राहावं, बनियन, टॉवेलवर-लुंगीवर आमदार येतो. रस्त्यावर राहताय का?, असंही अनिल परब म्हणाले. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले. तसेच अनिल परबजी टॉवेलवर मारलं किंवा कसंही मारलं, ते चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

काल (8 जुलै) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली.

संजय गायकवाड प्रकरणावर मुख्यमंत्री काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Sanjay Gaikwad: शिळं जेवण दिलं, आमदार संजय गायकवाडांनी धू धू धुतलं; आता कॅन्टीनबाबत धक्कादायक माहिती समोर