Devendra Fadnavis On Nishikant Dubey: मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं विधान झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी केलं होतं. निशिकांत दुबेंच्या या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये चिड निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशिकांत दुबेंच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्याठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि, माझं मत अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले? 

आपल्याला कल्पना आहे की, ज्यावेळी परकीय आक्रमकानी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठीचे लढले होते. आमचे अब्दालीने त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की, मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे. तो पंजाब पासून पेशावर पर्यंत हा मूल कामाला देऊन टाका बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असा आम्ही मान्य करून पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठीत तुम्ही मुलुख अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढायला गेले होते त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नकारात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

निशिकांत दुबे नेमकं काय म्हणाले होते?

मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला.  महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे. 

संबंधित बातमी:

Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray: मराठी लोकांना डिवचलं, राज अन् उद्धव ठाकरेंनाही अंगावर घेतलं, कोण आहेत निशिकांत दुबे?