Devendra Fadnavis on Kanhaiya Kumar, Delhi : उत्तर-पूर्व लोकसभा दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांना रिंगणात उतरवलं आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून मनोज तिवारी यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. कन्हैय्या कुमारला काँग्रेसने उमेदवारी दिल्याने उत्तर-पूर्व लोकसभा दिल्लीच्या निवडणुकीत रंगत आली आहे. कन्हैय्या कुमारसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील मैदानात उतरले आहेत. 'रिंकियाके पापा को हराणा है, और कन्हैय्या को जिताना है' असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत भाजपच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत. दिल्लीतून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांना आवाहन केले आहे. 


देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?


उत्तर-पूर्व दिल्लीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही लढाई देशभक्त मनोज तिवारी विरुद्ध तुकडे तुकडे गँगचे कन्हैय्या कुमार यांच्यात आहे. अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट सांगावं त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवल जे सांगतायत ते खोटं आहे का? अरविंद केजरवाल यांना कोणतीही सहानुभूती नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. निवडणुकीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी कन्हैय्या कुमारवर हल्लाबोल केलाय. 






मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चार वेळा प्रचार केला


मनोज तिवारी म्हणाले, देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी आले त्याबद्दल धन्यवाद! मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चार वेळा प्रचार केला, ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी आलो. ते प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा मी आलो होतो, ही आनंदाची गोष्ट आहे. समोर उमेदवार असा आहे की ज्याचं नाव घेतल्यावर लोकांना तुकडे तुकडे गँग आठवते. यावेळी सातच्या सात जागा आम्ही जिंकणार आहे. 


युवकाने कन्हैया कुमारच्या लगावली होती कानशिलात 


लोकसभा निवडणूकीतचा प्रचार करत असताना एका युवकाने कन्हैया कुमारला कानशिलात लगावली होती. सुरुवातीला हार घातला आणि हार घातल्यानंतर कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, कन्हैय्या सोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी लागलीच हल्ला करण्यासाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेतलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Vishal Patil: लढाई संपताच सगळे एकत्र, सांगलीत काँग्रेसप्रेमी कार्यकर्ता मेळाव्याला विशाल पाटलांची उपस्थिती, चर्चांना उधाण