BMC Election 2026 BJP: मुंबई हे आपलं घर आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही. ती जबाबदारी आपलीही आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होईल, असे वक्तव्य राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यासाठी आलेल्या भाजपच्या वर्षपूर्ती (BJP) मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या महापौरपदी भाजपतर्फे दावा ठोकला. अमित साटम (Amit Satam) तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष झाला तेव्हा फक्त अमित साटम होतात.  आता 100 दिवसांत आता तुम्ही आमच्यासाठी वरच्या अमितभाईंसारखे झाला आहात. भाजपात कार्यकर्त्याला तिकीट द्या अगर नका देऊ. मात्र, काम करण्यात आनंद येतो, तो वेगळाच असतो, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले. (Mumbai news)

Continues below advertisement

अमित साटम मेहनती आहेत. ही त्यांची निवडणूक नाही आहे. मात्र ते आपल्यासाठी परिश्रमाची परिकाष्ठा करत आहेत.  आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. महापौर आपला बनवायचा आहे, रिलिजस ड्युटी म्हणून ते पूर्ण करूयात, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फक्त भाजपच नव्हे तर इतर पक्ष कसे चालतील, हेदेखील ठरवतात: मंगलप्रभात लोढा

Continues below advertisement

या मेळाव्यात मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. आपण देवाभाऊंची विविध रुपं पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रुपं आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामं केली आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर  झाले. भाजप देवाभाऊमय तर आहेच. मात्र, महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील, हेदेखील देवाभाऊच ठरवतात. मी गेल्या 25 वर्षांपासून त्यांना बघतोय. राजकारण करण्याचे काम त्यांना कधी आवडतं तर कधी नाही. मात्र, आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्पर असतात आणि अडचणी आल्या तर धावून येतात, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Amit Satam: भाजपच्या काळात मुंबईचा अविश्वसनीय विकास, 54 टक्के जनता समाधानी: अमित साटम

आज 5 डिसेंबर आहे, देवाभाऊंनी शपथ घेतल्यावर एक वर्ष पूर्ण होत आहे. चार शहरात एक सर्व्हे केला गेला आणि सरकारच्या कामगिरीबद्दल काय वाटतं? तर 70 टक्के लोकांनी समाधानी असल्याचा फीडबॅक दिला. समृद्धीची घोषणा केली होती, होणार की नाही, कसं होणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, त्याचे काम पूर्ण झाले आणि उद्घाटन केलं गेले. मुंबईकरांना विश्वासच वाटत नाही आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी, अभ्युदय, मोतीलाल नगर पुर्नविकास होणार आहे. विश्वास न ठेवण्यासारखा हा विकास आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. मग पायाभूत सुविधाही तशाच आहेत. जगात आपल्या मेट्रो रेल्वेचे नेटवर्क तिसऱ्या क्रमांकाचे आहे. ऑस्ट्रेलियातील कोस्टल रोडची तुलना आपल्या कोस्टल रोडसोबत होते. मुंबईकर मोठ्या आशेने आपल्याकडे पाहात आहेत. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे, असे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी म्हटले.