मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये (Election) भाजप महायुतीला मिळालेलं यश हे अभूतपूर्व असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर, आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपच्या विजयाची हॅट्रिक आहे, मॅट्रिक आहे, सॅट्रिक आहे. परंतु, नगरपंचायत इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून 15 हजार करोड उडवले आहेत. वोटर्सला पैसे दिले, पैसे पाण्यासारखे वाहिले. आम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला हे जे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत आहेत, ते अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया आहे, अशा शब्दात शिवसेना संजय राऊत यांनी भाजप महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.  

Continues below advertisement

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी आज सायंकाळपर्यंत ठाकरे बंधूंच्या जागावाटपानंतर युतीची घोषणा होण्याचे संकेत दिले. तसेच, भाजपच्या विजयावर टीका करताना पैसे वाटपाचे गंभीर आरोपही केले आहेत. भाजपच्या विजयाची हॅट्रिक आहे, मॅट्रिक आहे, सॅट्रिक आहे. परंतु, नगरपंचायत इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून 15 हजार करोड उडवले आहेत. वोटर्सला पैसे दिले, पैसे पाण्यासारखे वाहिले. आम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला हे जे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, ते अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया आहे, अशा शब्दात शिवसेना संजय राऊत यांनी भाजप महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.   एकनाथ शिंदे बोलत आहेत, आमची शिवसेना असली तर जाऊन अमित शहा यांचे पाय धुवून तीर्थ प्या, जी शिवसेना तुम्हाला अमित शहा यांनी दिली त्या शिवसेनेचं पुण्य खूप मोठं आहे, ते पुण्य तुम्हाला मिळत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. 

सर्वोच्च न्यायालयावर तीव्र नाराजी

निवडणूक चिन्ह आणि पार्टीचा निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्ट अजून निर्णय देत नाही, कारण सुप्रीम कोर्टावर दबाव आहे, असेही राऊत यांनी म्हटले. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सहा तासात निर्णय देतात आणि 40 आमदार, ज्यांनी पार्टी बदलली त्यांच्याबाबत संविधान आणि न्यायालय अजून निर्णय देत नाही. आता तारीख 21 जानेवारी दिली आहे, इलेक्शन नंतर हे इलेक्शनदेखील तुम्ही खावा अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरही राऊतांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 

Continues below advertisement

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. तसेच नागपूर जिल्ह्यानेही मान अभिमानाने ताठ ठेवली आहे. या अभूतपूर्व विजयाबद्दल नागपूर जिल्हा भाजप युनिटचे अभिनंदन आणि नागपूरातील मतदार बंधू-भगिनींचेही धन्यवाद. कालच्या निकालाने महाराष्ट्रात भाजपच क्रमांक एकचं पक्ष असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. महायुतीने 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आणले आहे. आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला आहे, हे स्पष्ट झालं असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?