Devendra Fadnavis Majha Maharashtra Majha Vision: मी कोणत्याही रोलमध्ये गेलो की लगेच जॅकेट बदलतो. मी आमदाराचा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी लगेच मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये गेलो. मी मुख्यमंत्रीनंतर ज्यावेळी विरोधीपक्षनेता झालो, त्यावेळी सरकारला झोपू दिलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेत्याचा मी उपमुख्यमंत्री झालो, त्यावेळी विचार केला नाही, की मी मुख्यमंत्री होतो. मी लगेच उपमुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये गेलो. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये येणं सोपं होतं. त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं, त्यावेळी लगेच कामाला लागलो. त्यामुळे हे बदल माझ्यासाठी नवीनही नाही आणि फार कठीणही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
गेल्या अडीच वर्षांच आमचं महायुतीचं सरकार चांगलं काम करत होतं. खरंतर आमचं सरकार अडीच वर्षे वॉर झोनमध्ये काम करत होतं. लोकसभा, विधानसभा अशा निवडणुक, असा मोठा वॉर झोन होता. वॉर झोनमध्ये काम करताना त्यावेळेस आपले गोल शॉर्ट असतात. ज्यावेळी शांततेचा काळ असतो, त्यावेळी त्यानंतर आता लॉन्ग टर्मचे गोल ठेवावे लागतात. आता 100 दिवसांचा अजेंडा ठरवण्यात आलाय. प्रत्येक विभागाला 100 दिवसांचे टार्गेट दिलंय. आम्ही 15 एप्रिल पर्यंत वेळ दिला आहे..त्यांना त्यांचा तो प्लॅन पूर्ण करायचा आहे. तहसील स्तरावर 10 हजार ऑफिसेसला सात कलमी कार्यक्रम दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परवा मी आणि एकनाथ शिंदे आम्ही एमएसआरडीसीची बैठक घेतली शक्तीपीठ, रिंगरोड , नदी जोड प्रकल्प, विमानतळं अशा प्रकल्पांचे फायनाशीअल प्लॅनिंग केलं. पुणे विमानतळाचे नोटीफीकेशन आपण काढलं.शेतीच्या क्षेत्रात एआयचा उपयोग जास्तीत जास्त करायचा आहे.. त्यासाठी महाटेक अशी व्यवस्था आपण उभी करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुती मनपा निवडणूक एकत्र लढणार; देवेंद्र फडणवीसांची एबीपी माझाच्या कार्यक्रमात घोषणा-
महायुती मनपा निवडणूक एकत्र लढणार, मुंबईत एकत्र आहोतच , जिथे शक्य तिथे एकत्र , मुंबई एकत्र हे पक्के, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. सेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरेंना महायुतीतसोबत घेणार का?, असा सवालही विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंच्यासंबंधात आजतरी निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय ते घेत असतात. त्या त्यावेळी विचार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
नागपूर हिंसाचार प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मूठभर लोकं अश्या प्रकारच्या गोष्टी करतात आणि शहराचे नाव खराब होतं आणि सामाजिक सलोखाही बिघडला.1992 नंतर पहिल्यांचा नागपुरात अशा प्रकारचा तणाव दिसला. दोन गोष्टी महत्वाच्या दिसल्या. नागपुरातील संस्कृतीमुळे लगेच कन्ट्रोल आला. जे घडलं ते योग्य नाही. व्हीएचपी आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर जाळण्याचा कार्यक्रम घेतला. सकाळी आंदोलनानंतर शांतता होती. दुपारनंतर काही युट्युबर्सनी औरंगजेबाच्या कबरीला जी चादर गुंडाळली होती त्यावर कुराणमधील आयाती लिहल्या होत्या. प्रत्यक्षात असं काही नव्हतं. त्यानंतर अशा पोस्ट केल्या गेल्या आणि मग संध्याकाळी जमावाने तोडफोड, दगडफेक केली. पोलिसांवर हल्ला झाला.. त्यांनी बेधडकपणे घूसुन त्यांना रोखलं. कदम यांच्यावर तर कुऱ्हाडीने हल्ला केला. एक मास्टरमाईंड मालेगावचा आहे. तो नागपुरात येऊन का करत होता. ज्यांनी वातावरण बिघडवलं त्यांना आम्ही सोडणार नाही. आम्ही व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या लोकांवरही गुन्हे दाखल केले. पोलिसांवर हल्ला करणं खपवून घेतलं तर राज्यात कायदा सुव्यवस्था राहणार नाही, त्यांना अद्दल घडवू, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. नागपुरमधील हिंसाचारानंतर इंटिलीजन्सचे फेल्युअर म्हणता येणार नाही. मात्र दुपारनंतर सोशल मिडीया ज्या पद्धत्तीने ट्रॅक व्हायला हवा होता, तो झालेला दिसत नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोस्ट गेल्या. आपल्याकडे केपॅबलीटी आहे मात्र वापरण्याची सवय केली पाहिजे. आता प्रत्यक्षात नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
लाडकी बहीणमुळे विकासाची गती कमी झाली आहे का?
लाडकी बहीणमुळे विकासाची गती कमी झाली आहे का?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर या योजनेला वेगळ्या नजरेने बघायला हवं.. या योजनेमुळे महिलांना प्रतिष्ठा मिळाली. दोन पैशे कमवत नसेल तर लोक त्यांना प्रतिष्ठा देत नाही. आत्मसन्मान, आत्मविश्वास मिळाला. नागपुरात महिलांनी चांगलं मॉडेल सुरु केलं आहे. महिलांनी हे 1500 रुपये जमा करुन स्मॉल क्रेडीट सोसायटी सुरु केली. 30 लाख रुपये जमा करुन कर्ज देणं सुरु केलं. हे आम्ही राज्यभर करणार आहोत. त्यासाठी बचत गटांची मदत घेऊ...गेल्या दिड वर्षात 24 लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या. यंदा 26 लाखांचे टार्गेट आहे. 40-45 हजार कोटी लोक अशा पद्धत्तीच्या सामाजिक सेवांमध्ये टाकतो. तेव्हा पायाभूत सेवांमधील गुंतवणुकीवर काही बंधनं येतात. आम्ही तिघांनी जेव्हा प्लॅनिंग केलं. आपण आपलं फिस्कल डेफीशीट 3 टक्क्यांच्या आत ठेवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावर देखील भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत प्रोफेशनली तपास केला. आपण जर बघितलं तर या संपूर्ण चर्चेमध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही तरीही आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, याचा एकमेव कारण असा आहे की, या संपूर्ण प्रकरणांमध्ये ज्याला मुख्य आरोपी केलेला आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड आहे. वर्षानुवर्ष धनंजय मुंडे यांचे राजकारण त्यांनी सांभाळलेला आहे आणि म्हणून सहाजिक महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा होती की अशा प्रकारे जर नेत्यांच्या जवळचे लोक इतका क्रूर अशा प्रकारचा काम करत असतील तर नेत्यांनी काही ना काही तरी पश्चाताप म्हणून किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो. नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे नंतर किंवा चर्चेत गेल्यानंतर दोन गोष्टी क्लियर झाल्या. एक चर्चेतमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि दोन वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर आमची चौकशीची आणि कारवाईची तयारी आहे, पण उगीच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पोलीस पुर्णवेळ हजर होते, नव्हते हे खोटं आहे. नागपुरात छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत, तिथे पोलीस पोहोचले नाही हा प्रॉब्लेम होता. आंदोलकांची संख्या जास्त होतं तसं नाही. हे लोक त्यांच्या समाजाला बदनाम करतायत. पोलिसांचा रिस्पॉन्स योग्यच होतं. त्यांनी कसा मुकाबला केला, त्याचे सीसीटीव्ही आहेत. हिंसा नागपुरातच का झाली याची उत्तर मी शोधतोय. मी एक शंका व्यक्त केली. अधिकारीक बोलत नाही. या गोष्टी ठरवून झाल्या का?, हे पहावं लागेल. या आधीच्या घटनांमध्ये एक पॅटर्न होता, तो इथे होता का?...सोशल मिडीयावर बांग्लादेशच्या बंगालीच्या पोस्ट दिसतायत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदेंप्रमाणे आम्हाला हलक्यात घेऊ नका हे दाखवायचं होतं- देवेंद्र फडणवीस
तिघांमध्ये कुठलाही विसंवाद तयार होणार नाही. ला तिघांना राजकारण नीट समजतं. आम्ही ट्रान्फरन्सीवर फोकस केला आहे. जितकं अकाऊंटेबर सरकार दिलं जाईल त्याचा प्रयत्न आह. ओएसडीसंदर्भात मी मंत्र्यांना सांगितलं तुमचा ओएसडी मी ठरवणार नाही. मात्र तुम्ही नाव पाठवाल त्याला अप्रुव्हल देण्याचा अधिकार माझा आहे. त्या नावात जर मला वाटलं या लोकांचा फिस्कर अशी इमेज आहे पास्ट रेकॉर्ड चांगला नाही. अशांना अप्रुव्ह नाही केलं. त्या मंत्र्यांना सांगितलं दुसरं नाव पाठवा, योग्य असेल तर अप्रुव्ह केलं. अनेक मंत्र्यांनी माझ्यावर राग व्यक्त केला. काहींनी पाठीमागे माझ्याकडे येऊन राग व्यक्त केला. आपल्याला वाईटपणा घ्यावा लागतो. काहींनी माझ्या ओएसडींसर्दर्भात शोधून काढण्याचा प्रयत्न केला. जे मी लोकांना शिकवतो ते मी पाळतो. त्यामुळे त्यात काही सापडलं नाही. ज्या ओएसडींना आम्ही नाकरलं त्यांनी एकत्र येऊन हे केलं. मला आता प्रुव्ह करायला राहिलेलं नाही. ज्या प्रकारे आम्ही 2019मध्ये मी बाहेर गेलो, तेव्हा मनात एक दु:ख होतं. आम्हाला दाखवून द्यायचं होतं. एकनाथ शिंदेंप्रमाणे आम्हाला हलक्यात घेऊ नका हे दाखवायचं होतं. या पाच वर्षात वाईट पणा घ्यावा लागला तरी महाराष्ट्राची घडी योग्य बसवाची. लोकं तुम्ही कामं काय केली ते लक्ष ठेवतात. राजकारणात कोणी 100 टक्के स्ट्रीक्ट राहू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
दिशा सालियन प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी केलं भाष्य-
दिशा सालियन प्रकरणाची ही चर्चा सुरु झाली, ती कोर्टातील केसमुळे सुरु झाली. तिच्या वडिलांनी पण मुलाखत दिली आहे. कोर्ट काय म्हणतय...कोर्टात ते काय पुरावे देतात. याच्या आधारावर शासनाची भुमिका ठरेल. कोर्ट ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा तेव्हा काही नवीन गोष्टी आल्या तर त्यानूसार सरकार निर्णय घेईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले, यावरे त्यांनी कोणते उत्तर दिले पाहा-
1. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?
देवेंद्र फडणवीस- नाही
2. लाडके उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस- दोघेही माझे लाडके आहेत आणि मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहोत.
3. लाडके ठाकरे कोण?, उद्धव ठाकरे की राज ठाकरे?
देवेंद्र फडणवीस- ठाकरे अशे आहेत की त्यांना आपण लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं, त्यामुळे यामध्ये आपण काय पडायचं, पण एक खरं सांगतो, गेल्या 5 वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही, माझा राज ठाकरेंसोबतच संबंध राहिलाय. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले, म्हणजे मारामारी नाहीय, समोर आलो की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो, पण उद्धव ठाकरेंसोबत संबंध नाही.
4. लाडका मंत्री कोण, गिरीश महाजन की नितेश राणे?
देवेंद्र फडणवीस- लाडके मंत्री योजना सुरु केलेली आहे. त्याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणे अर्ज घेतलेले आहेत. त्याचं प्रोसेसिंग सुरु आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर सांगतो.
5. सर्वात जास्त नाराजीनाट्य कोण करतं?, अजितदादा की एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस- नाराजीनाट्य वैगरे कोणीच करत नाही. अलीकडच्या काळामुळे, सोशल मीडियामुळे कोणत्याही गोष्टीला कसेही सांगितले जाते. माझा अनुभव असा आहे की, अजितदादा असो की एकनाथ शिंदे, दोघांचीही नाराजीनाट्य नाही. काही प्रश्न असतात, ते आम्ही एकत्र येऊन सोडवतो. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक हा भावनिक असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे भावनिक आहेत. तर अजितदादा कामाच्या बाबतीत प्रॅक्टिकल आहेत.
टॉप 3 प्रायोरिटी कोणत्या?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
1) इन्फ्रा कामे मार्गी लावणे2) शेती - हवामान आणि तंत्रज्ञान सुसंगत शेती3) गुंतवणूक आणून रोजगार निर्मिती