मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना मोठा धक्का दिला आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल करण्यात आला आहे. महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा वाद समोर आला होता. त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागानं राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांच्याकडे देण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं अध्यक्षपद यापूर्वी परिवहन मंत्र्यांकडे असायचे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात नियमात बदल करुन भरत गोगावले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटीचं स्टेअरींग होतं. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयानं प्रताप सरनाईक यांना धक्का बसला आहे. 

गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

एसटीचं अध्यक्षपद गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे 

राज्यात महायुती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. 2014-2019  या काळात एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे होते. मविआ सरकारच्या काळात सेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद होतं. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करुन एसटीचं अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आलं होतं. एसटीच्या उत्पन्नवाठीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच कर्नाटक राज्याचा दौरा केला होता. आता एसटी महामंडळाचं अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. 

पालकमंत्री पदाचा तिढा कायम 

महायुतीतील पालकमंत्री पदाबाबतचा तिढा अद्याप संपलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंत्री अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेनं या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद मिळावं अशी भूमिका घेतली होती. रायगडसाठी भरत गोगावले आणि नाशिकसाठी दादा भुसे यांच्या नावावर शिवसेना आग्रही होती. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

इतर बातम्या : 

Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'