Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meet at Vidhan Bhavan : मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra News) पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी विधीमंडळात फारच वेगळं चित्र पाहायला मिळालं. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या सर्वसामान्यांनी आज विधीमंडळातील मैत्रीपूर्ण भेटीगाठींचं चित्र अनुभवलं. सर्वात आधी विधीमंडळात चंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरे भेट झाली. तर त्यानंतर लिफ्टमध्ये उद्धव-फडणवीस 'अचानक' भेट झाली. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर या भेटीबाबत प्रतिक्रिया देणं उद्धव ठाकरेंनी टाळलं. मात्र, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी या भेटीवर भाष्य केलं आहे. माझा आणि देवेंद्र फडणवीसांचा लिफ्ट प्रवास योगायोग, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या लिफ्ट प्रवासाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगचं आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे या पुढे गुप्त बैठक तिथेच करू."
पत्रकार म्हणाले, "कोण कोणाला डोळा मारतंय, हे कळलं पाहिजे"; उद्धव ठाकरे म्हणाले...
चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानभवातून बाहेर पडले. तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरलं. फडणवीसांसोबतच्या लिफ्ट प्रवासाबाबत प्रतिक्रिया विचारली. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. तेवढ्यात कोण कोणाला डोळा मारतंय, कळालं पाहिजे, असं मिश्किल प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना मी उद्यापासून गॉगल घालून येऊ का? असा प्रश्नच उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना विचारला.
विधीमंडळाच्या लिफ्टजवळ ठाकरे आणि फडणवीसांची भेट, पुढे काय घडलं?
आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे. विधीमंडळातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस विधीमंडळाच्या तळमजल्यावर लिफ्टची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीशी बातचित झाली. पण त्यानंतर मात्र, लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर मात्र, दोन्ही नेते दोन विरुद्ध दिशांना निघून गेले. तर दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही भेट झाली. अंबादास दानवे आणि अनिल परब त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी तिथेही खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
दरम्यान, एरव्ही एकमेंकांवर टीकेचे बाण सोडणारे महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आज एकमेकांशी अगदी हसत-खेळत बोलताना दिसले. गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंप अनुभवले. राज्यातील राजकारणानं कळस गाठल्याची अनेक वक्तव्यही आपण ऐकली. पण आज बऱ्याच दिवसांनी विधान भवनात हसतं खेळतं वातावरण पाहायला मिळालं.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात आज होणाऱ्या भेटीगाठींमुळे पुन्हा मनोमिलन होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरे भेट झाली. तर त्यानंतर लिफ्टमध्ये उद्धव-फडणवीस 'अचानक' भेट झाली. पण या अचनाक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.
पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ना ना करते प्यार...लिफ्टमधील व्हिडीओबद्दल ठाकरे काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :