नागपूर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांदरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी फूट पडल्याचे चित्र बघायला मिळालं आहे. महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दरी इतकी वाढली होती की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतात, अशा चर्चेनं जोर धरला होता. एकंदरीत या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर महायुतीच्या गोटातून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात रात्री उशिरा एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रमुखांमध्ये हि बैठक पार पडलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी सोमवारी रात्री भाजपसह महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली.

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह काही मोजक्या प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती असल्याची माहिती आहे. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या समीकरणांबाबत भाजप नेत्यांमध्येही चर्चा झाल्याचीही माहिती आहे. महायुतीत अधिक वाद होऊ नयेत यासाठी नेतृत्वाकडून भाजप नेत्यांना निर्देश देण्यात आले आहे. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांमधील संबंध अधिक चांगले होत असल्याचे दिसून येत आहे. तर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांमध्ये ही बैठक पार पडलीय.

Devendra Fadnavis: पक्षप्रवेश करून घेताना महायुती दुखावली जाणार नाही, याचा प्रत्येकाने विचार करा

Continues below advertisement

दरम्यान, महायुतीमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावरही या बैठकी चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षप्रवेश करून घेताना महायुती आणि मित्र पक्ष दुखावले जाणार नाही, याचा प्रत्येकाने विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहे. त्यामुळे आता महायुतीमधील फोडाफोडीवर नागपूरमध्ये तह झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. तर देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांशी झालेल्या या चर्चेनंतर महायुतीतील नाराजीनाट्य दूर होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (8 डिसेंबर) उशिरा नागपुरात बंद दाराआड बैठक घेतली. जवळजवळ दीड तासाच्या चर्चेनंतर, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे देखील बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुतीचा भाग म्हणून लढवण्याच्या शक्यतेवर सकारात्मक चर्चा झाल्याचीही माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :