पुणे : मशिदीत स्क्रीन लावून कुणाला मतदान करा आणि करू नका  सांगतायत, असं पहिल्यांदाचा घडतंय, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. संजय राऊत आणि राहुल गांधी एकाच बुद्धिमत्तेचे आहेत. भाजपसाठी निवडणूक कठीण झालीय हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वाटतंय, पण तसं नाहीय. आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.


मशिदीत स्क्रीन लावून कुणाला मतदान करा सांगतायत


मशिदीत मोठे-मोठे स्क्रीन लावून कुणाला मतदान करा आणि करू नका सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय. शरद पवार आणि गांधींचा काय संबंध? रवींद्र वायकर नेमकं असं का म्हणाले, त्यांना मी विचारणार आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं बलिदान कोणी नाकारत नाही. पण केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करता येईल का? महात्मा गांधींचा विचार आणि कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. गांधी आणि पवारांचा काय संबंध, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे. 


संजय राऊत आणि राहुल गांधी एकाच बुद्धिमत्तेचे


चंद्रकांत पाटील जे बोलले होते त्याचा खुलासा त्यांनी केलाय. जे बोललो ते बोलायला नको होतं, असं ते म्हणालेत. संजय राऊत आणि राहुल गांधी एकाच बुद्धिमत्तेचे आहेत. भाजपसाठी निवडणूक कठीण झालीय हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सेट केलेलं नरेटिव्ह आहे, मात्र प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. आम्ही चांगल्या जागा जिंकू, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.


फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार


शरद पवार म्हणाले 35 जागा जिंकणार . 13 जागा आमच्यासाठी सोडल्या याबद्दल त्यांचे धन्यवाद, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात तीन जण निर्दोष सुटले. या प्रकरणात वरच्या न्यायालयात जायचं किंवा नाही, याचा निर्णय कायदा आणि न्याय विभाग घेईल, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.


पाहा व्हिडीओ : शरद पवारांच्या उत्तराला फडणवीसांचं प्रत्युत्तर; ऑफरवरून राजकारण



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Devendra Fadnavis on PM Modi : आपले मोदीजी फक्त भारताचे नव्हे, तर शंभर देशाचे नेते आहेत : देवेंद्र फडणवीस