Delhi MCD Election 2022: दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान पूर्ण झाले. या निवडणुकीसाठी सकाळपासून संथ गतीने मतदान सुरू होते. मात्र दुपारनंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला. एमसीडी निवडणुकीत सर्व 250 वॉर्डांमध्ये संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुमारे 50 टक्के मतदान झाले. तर काही मतदार मतदानाच्या शेवटच्या तासात पोहोचले. थंडी आणि धुक्याचा प्रभाव असल्याने प्रकाशाचा अभाव दिसून येत असला तरी शेवटच्या क्षणीही रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


एबीपी लाईव्हशी संवाद साधताना पटपरगंज प्रभागातील बापू पब्लिक स्कूलमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचलेल्या 60 वर्षीय मुकेश देवी यांनी सांगितले की, आवश्यक कामामुळे त्या दिवसभरात मतदान केंद्रावर पोहोचू शकल्या नाही. मात्र सायंकाळी उशिरा केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदान केले. निवडणुकीतील प्रश्नावर मुकेश देवी यांनी सांगितले की, आता दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. राजधानीचा विकास चांगला झाला पाहिजे आणि या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी यावेळी मतदान केले आहे.


दिल्ली महापालिका निवडणुकीचा निकाल 7 डिसेंबरला लागणार आहे. एबीपी लाइव्हशी संवाद साधताना, ईव्हीएम मशीन बंद होण्यापूर्वी बापू पब्लिक स्कूल मतदान केंद्रावर पोहोचलेल्या 42 वर्षीय मतदार शबाना यांनी सांगितले की, आम्ही आणि आमच्या कुटुंबीयांनी दिल्लीचे मूळ प्रश्न लक्षात घेऊन मतदान केले आहे. दिल्ली महानगरपालिकेत मतदार म्हणून मी तिसऱ्यांदा मतदान केले आहे. परंतु मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी ही निवडणूक खूपच वेगळी  आहे.






यावेळी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत असून सर्वजण आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. दुसरीकडे मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेल्या या मतदारांनी आपापल्या भूमिकेतून यावेळी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात काम करणाऱ्या उमेदवारावर विश्वास ठेवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Samruddhi Mahamarg : नऊ एअरबॅग्ज, फक्त 7.4 सेकंदात पकडते 100 kmpl वेग; फडणवीस चालवत असलेल्या कारची किंमत जाणून व्हाल थक्क