Vanchit Bahujan Aghadi on EVM अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVMच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय ही वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक आकडेवारीच मांडली आहे. तसेच हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी देखील त्यांनी केली आहे.
EVM वरुन ठाकरे गट आक्रमक, आकडेवारी देत थेट प्रेझेंटेशन मांडलं!
ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत. विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांना सम-समान आकडेवारी पाहायला मिळाली. एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल आणि बॅलेट मतदान. पोस्टल, बॅलेट मतदान हे ट्रेंडचं रिप्रेझेंटेशन असतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मविआचा 31 जागांवर लीड होतं तर 16 जागांवर महायुतीला लिड होतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर लीडवर आहे. तर महायुती 140 जागांवर आघाडीवर आहे. तर ईव्हीएमच्या आकडेवारीत 143 वरून 46 जागांवर महाविकास आघाडीला लीड आली आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा