Congress YouTube Channel: काँग्रेस पक्षाचे युट्युब चॅनल डिलीट झाले आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. हे चॅनल का डिलीट झाले, याबाबत तपास सुरू आहे. काँग्रेसने यूट्यूब आणि गुगल या दोघांशी संपर्क साधला आहे आणि त्यांचे चॅनल रिस्टोर करण्यास सांगितले आहे.
पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे यूट्यूब चॅनल 'इंडियन नॅशनल काँग्रेस' (Indian National Congress) डिलीट झालेआहे. आम्ही हे ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची YouTube आणि Google टीमशी चर्चा सुरू आहे. तपास सुरू असून, तांत्रिक बिघाड होता की, काही कट होता, हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच हे चॅनल रिस्टोर होईल, अशी आशा आहे.
याआधीही देशातील अनेक बड्या नेत्यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र कोणत्याही पक्षाचं संपूर्ण यूट्यूब चॅनल डिलीट झाल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. सध्या याचे कारण स्पष्ट नसल्यामुळे, अशा परिस्थितीत काँग्रेसही आपल्या अधिकृत निवेदनात केवळ तपासाबाबतच बोलत आहे. पक्षाकडून हॅकिंगचा संशय वर्तवला जात आहे. मात्र ठोस माहिती अद्याप आलेली नसल्याने ते यावर अधिक भाष्य करत नाही आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून होणार सुरू
काँग्रेस 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू होईल आणि 12 राज्यांमधून जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. या यात्रेत काँग्रेसचा झेंडा दिसणार नाही. त्याऐवजी काँग्रेस नेत्यांच्या हातात तिरंगा दिसणार आहे.
भारत जोडो यात्रा 150 दिवस चालणार
समाजातून द्वेष दूर करणे हे भारत जोडो यात्रेचे प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाने सांगितलेआहे. या प्रवासादरम्यान एकूण 3,500 किमी अंतरची यात्रा केली जाईल. हा प्रवास सुमारे 150 दिवस चालणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
जो निवृत्त होत आहे त्याला या देशात किंमत नाही, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली खंत
Political News : केजरीवालांनी गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन? योगेंद्र यादव यांनी मौन सोडले, म्हणाले..