Congress MLA Joins Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. विद्यमान आमदाराने काँग्रेसची साथ सोडलीये. हिरामण काँग्रेस यांनी काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. देवगिरी निवासस्थानी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. 


अजित पवार म्हणाले, मागे आम्ही सगळ्यांनीच अनेक वर्ष सरकारमध्ये सरकारच्या बाहेर काम केलं. पाच वर्षांपूर्वी असेच निवडणुकीच्या काळामध्ये इगतपुरी मतदारसंघ हा आम्हाला काँग्रेसला द्यावा लागला. त्यावेळेस काँग्रेसकडे उमेदवार अधिक होते. परंतु त्याच्यातनं चर्चा झाली.हिरामण खोसकरांना पण मी चांगल्या पद्धतीने त्यांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता मदत करत आलो आणि त्याच्यातलं संबंध वाढत गेले त्याच्यातून आपलेपणा त्या ठिकाणी निर्माण झाला. एक आदिवासी समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ता अशा प्रकारची हिरामणची ओळख आहे. शेवटी आपण समाजासहित ठेवून काम करतोय. एक चांगल्या प्रकारची भावना सतत मनामध्ये ठेवून आणि मतदारसंघातल्या सर्वांनाच सातत्याने मान सन्मान त्यांना रिस्पेक्ट देऊ.


अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नेते


संपतनाना सकाळे,माजी जिल्हा उपाध्यक्ष
जनार्दन मामा माळी
संदीप गोपाळ गुळवे
उदय जाधव घोटी
दिलीप चौधरी
ज्ञानेश्वर लहाने,माजी सभापती मार्केट कमिटी
विनायक माळेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य
पांडुमामा शिंदे
ज्ञानेश्वर कडू
जगन कदम


अजित पवारांनी याबाबत ट्वीट केले आहे. अजित पवार ट्वीटरवर लिहितात, इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादीचे विकासाभिमुख  विचार स्वीकारत माझ्या आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. काँग्रेस आमदार हिरामन खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश पार पडला


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Bhagwangad : मोठी बातमी : भगवान गडाच्या चौथ्या मठाधिपतींची घोषणा, नामदेव शास्त्रींनी उत्तराधिकारी जाहीर केला


BJP : चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत उद्या सकाळी आमदारकीची शपथ घेणार? आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची 3 नावं ठरली