Prithviraj Chavan On Modi Ki Guarantee : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपकडून (BJP) जाहिरातवर भर दिला जात आहे. अशात मागील काही दिवसांपासून 'मोदी की गॅरंटी' (Modi Ki Guarantee) अशी जोरदार जाहिरात केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यावरच काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला आहे. याबाबत आपण थेट निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. 


याबाबत बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “ भाजपच्या प्रचाराची आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. मोदी यांची गॅरंटी योग्य नाही. एका व्यक्तीची गॅरंटी म्हणजे एका व्यक्तीचा  प्रचार आहे. पक्षाचा असेल तर काही हरकत नाही. मात्र, जनतेच्या पैशातुन एका व्यक्तीचा प्रचार योग्य नाही. व्यक्तीगत प्रचार हा व्यक्तीगत केला तर त्याला हरकत नाही. मात्र, सर्व पेट्रोल कंपन्याना आदेश आहे की, सर्व पेट्रोल पंपावर 'मोदी की गॅरंटी' असे बोर्ड लावण्यात यावेत. त्यामुळे, आतापर्यंत जेवढा खर्च केला तो वसुल करण्यात यावा. आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहे, असे चव्हाण म्हणाले. 


राहुल गांधींच्या सभेला परवानगी...


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार असून, या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत राहुल गांधी यांची जाहीर सभेने यात्रेचा समारोप केला आहे. दरम्यान, यावरच बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "राहूल गांधी यांच्या सभेसाठी आम्ही बीकेसी आणि  शिवाजी पार्कची मागणी केली होती. याआधी राजकीय सभांना परवानगी दिली होती.  त्यामुळे आम्हालाही परवानगी मिळाली, असल्याचे चव्हाण म्हणाले. 


शिवसेनेचा निर्णय निवडणूकीच्या आधी झाला पाहिजे


शिवसेना कुणाची या प्रकरणी न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्या निकालावर बोट ठेवले आहे. यावरच बोलतांना चव्हाण म्हणाले की, “जर तर वरती बोलण योग्य नाही. मात्र, निर्णय हा निवडणूकीच्या आधी झाला पाहिजे. नाही तर त्याला काही अर्थ नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


भाजपकडून जोरदार प्रचार....


2014 आणि 2019 मध्ये निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली होती. प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून वेगवेगळा मुद्दा समोर आणला जातो. यंदाच्या निवडणुकीत मोदी की गॅरंटी हा मुद्दा भाजपकडून पुढे करण्यात आला आहे. मागील 10 वर्षात केलेल्या कामाचा पाढा वाचत भाजपकडून मोदी की गॅरंटी असा प्रचार केला जात आहे. यासाठी अनेक जाहिराती सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहे. विशेष म्हणजे हाच प्रचार शासकीय पैशातून केला जात असल्याचे आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


'कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता?'; चंद्रशेखर बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल