मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत, असे त्यांनी म्हटले. आता यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
अनिल देशमुख यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटले आहे की, 4 वर्षापूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असे त्यांनी म्हटले.
कर्म तुम्ही कराल अन् दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही
यावर चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केलाय. चित्र वाघ यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, 4 वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही, ते तुमचे कर्म आहे. सारे पुरावे विधानसभेच्या रेकॉर्डवर आहेत. माध्यमांकडेही त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या अधिकार्यावर तुम्ही दबाव टाकला, त्या अधिकार्यानेच जबाब दिला आहे. कर्म तुम्ही कराल आणि दोष आमच्या नेत्यांवर टाकाल, हे चालणार नाही.
सरकारी वकील कट रचतो, गृहमंत्री एसपींवर दबाव टाकतात, त्याचे स्टींग सभागृहात येते, सीबीआय चौकशीचे आदेश हायकोर्ट देते आणि तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांवर आरोप करणार? त्यापेक्षा गिरीश महाजन तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही कुणाचा दबाव आहे आणि म्हणून मला खोटा गुन्हा दाखल करावाच लागेल असे सांगितले होते, ते एकदा सांगूनच टाका. आहे हिंमत? असा पलटवार चित्रा वाघ केला आहे.
आणखी वाचा