Narhari Zirwal On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात घेण्यात आलेलं नाही. छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान आज अन्न औषध विभाग मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ भाजपात जाणार नाहीत, ते अजितदादा बरोबरच राहतील असं झिरवळांनी म्हटलं आहे.
नरहरी झिरवाळ बोलताना म्हणाले, छगन भुजबळ नाराज असताना मी त्यांना भेटलो, जी वागणूक मिळाली त्यामुळे ते नाराज आहेत, वागणूक चांगली दिली जात नाही असं ते म्हणाले, त्यावर मी त्यांना सांगितले तुम्ही सर्वांत मोठे आहेत, तुम्ही आमच्यासाठी वेगळा निर्णय घेऊ नका. राज्यसभा देऊ अशी चर्चा आहे, असे मी बोलोलो तर त्यांनी राग व्यक्त केला. आता समाजात वातावरण गढूळ झाले आहे. आता मला राज्यसभेवर पाठवीत आहेत असे भुजबळ बोलले होते, असं झिरवळ म्हणालेत.
बनवाट औषधे विक्री प्रकरणी झिरवळ ॲक्शन मोडमध्ये
बनवाट औषधे विक्री केली जात आहे. हे प्रकरण काय आहे ते बघून त्यावर बंधन घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लोकांच्या जीवन मरणाशी निगडित खाते मला मिळाले आहे, त्यामुळे त्याला न्याय देणार. भेसळ थांबविण्याचा प्रयत्न करणार, आधी आमच्या भागात हार्ट अटॅक, ब्रेन ट्युमर हे विषय माहिती नव्हते पण आता जाणवते आहे. आदिवासी खाते मला मिळेल असे वाटत होते पण नाही मिळाले. याआधी अनेकांनी खाते सांभाळून न्याय दिला. पण, त्यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. मी आदिवासी मंत्री नसलो, तरी मी काही सूचना करेल, मी मंत्रिमंडळमध्ये आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
गॅस योजना सुरू झाली, आधी फुकणी असायची. चूल पेटवली जात होती, त्यातून महिलांच्या पोटाचे आजार वाढले होते, ते दूर होण्यास मदत झाली. आजही आदिवासी लोक आयुर्वेदिक काम करतात, लांबून लोक त्याकडे येतात, त्यातील काही औषधे हे आयुर्वेद शास्त्रात आणता येतील का त्याचा विचार केला जाणार आहे. आदिवासी बांधवांकडे असणाऱ्या ज्यांना गावठी उपचार म्हणतात, त्यांना आयुर्वेद औषधामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार अशी घोषणा नरहरी झिरवाळ यांनी केली आहे.