Chhagan Bhujbal, मुंबई : "महात्मा फुले ब्राह्मण विरोधक नव्हते ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते. ब्राह्मणपेक्षा आपल्या लोकांनी त्यांना जास्त विरोध केला. फुलेंनी पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली, भिडे कोण ब्राह्मण.. त्यांना आपल्या लोकांनी कर्मठ लोकासोबत विरोध केला. दुसरी शाळा चिपळूणकर यांच्या वाड्यात सुरू केली, तेही ब्राह्मण होते", असं मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री
छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्री फुले स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
आंबेडकर यांचा आहे पण महात्मा फुलेंचा पुतळा नव्हता
छगन भुजबळ म्हणाले, कुडाळहून पुतळे आणले, मागेपुढे पोलीस होते, तिथून दोन दिवसात आले त्यांचे पोलिसांचे आभार मानतो. 1951 साली बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतिबा फुले यांच्या पुतळा नाशिकमध्ये उभारला आहे. 15 वर्ष मी बघत होतो, महाराजांचा पुतळा आहे, आंबेडकर यांचा आहे पण महात्मा फुलेंचा पुतळा नव्हता, अखेर जागा मिळाली. पुतळा कसा असावा ही सर्व संकल्पना आणि जबाबदारी समीर भुजबळ यांची आहे.
देशातील सर्वात मोठा अर्धपुतळा आहे, 18 फूट उंचीचे अर्ध पुतळे आहेत. महात्मा फुले याना जिवंतपणी आणि मृत्यूनंतर ही विरोध झाला. पुण्यात 1925 मध्ये पुतळा उभारणार होते त्याला काही कर्मठ लोकांनी विरोध केला. एक फुले होते त्यांनीही विरोध केला. त्यानंतर 44 वर्षांनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळा उभारण्यात आला.
ब्राह्मणाच्या यशवंत नावाच्या मुलाला ज्योतिबा यांनी दत्तक घेतले, त्याला डॉक्टर केले
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले कवियत्री होत्या. ब्राह्मणाच्या यशवंत नावाच्या मुलाला ज्योतिबा यांनी दत्तक घेतले, त्याला डॉक्टर केले. पुण्यात 1896/97 ला प्लेगची साथ आली. तेव्हा रोगी दिसला की इंग्रज त्याला उचलून न्यायचे पुढे कुठे तो दिसत नव्हता. सावित्रीबाई फुले त्यांचे उपचार करत होत्या. रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेग झाला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
यापेक्षा मोठे समाजकार्य काय असते? असं म्हणत छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचं महत्त्व स्पष्ट केलं.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जगासाठी आदर्श होत्या
एकनाथ शिंदे म्हणाल्या, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जगासाठी आदर्श होत्या. आतापर्यंतच्या इतिहासात अर्धपुतळा एवढा मोठा देशात पहिल्यांदा बघत आहोत. अतिशय कपलकतेने स्मारक उभे केले. एखादे काम हातात घेतले की ते तडीस नेण्याचे काम भुजबळ करत आहेत. पुतळे सर्वाना प्रेरणा देतील. त्यांच्या कार्याची उंची आपल्याला फूट पट्टीत मोजता येणार नाही. फुले दाम्पत्याचे काम सोन्याला फिके पडणारे आहे. सोन्या सारखे काम आहे. नायगाव इथल्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला 100 कोटी रुपये मंजूर केले.
इतर महत्वाच्या बातम्या