Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अलीकडेच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. महायुती सरकार स्थापन झाले तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागली. दरम्यान, धनंजय मुंडेंचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार का? या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी छगन भुजबळ यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे निर्णय घेतील", असे त्यांनी म्हटले. तथापि, पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न प्रश्न विचारला असता, छगन भुजबळ पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.  

Continues below advertisement

छगन भुजबळ पत्रकारांवर भडकले

"धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाल्यास तुम्ही राजीनामा देणासंदर्भात वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत विचारले असता छगन भुजबळ चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रोखठोक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली का? चला पुढे, काहीतरी विचारत नका बसू. त्यांच्यावर मुळचे आरोप काय आहेत ते बघा. संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात आरोप झाले होते, आणि जी क्लिन चीट मिळाली ती कृषी खात्याशी संबंधित आरोपांबाबत होती. मग अशा प्रश्नांचा काही अर्थ आहे का?  "आता मी तुम्हाला परत उत्तर देणार नाही. मी असं सांगितलं होतं की, त्यांच्यावरील आरोप निर्दोष ठरले तर मी त्याबाबतचं विधान केलं होतं, असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील 

दरम्यान, कृषी खात्यातील घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयाकडून क्लीन चीट देण्यात आली. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, आरोप होत असतात, कधी-कधी आरोप बरोबर असतात, तर कधी ते आरोप चुकीचेही असतात. मग त्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे न्यायालयात जाणं आणि पूर्णपणे आरोपांची छानणी करणे. समजा त्यांच्यावरील आरोपांची छानणी केल्यानंतर जर असं आढळलं की धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करण्यात आले. त्या आरोपांची छानणी केल्यानंतर हे समोर आलं की त्या आरोपात काही तथ्य नाही. त्यामुळे न्यायालयाने त्या प्रमाणे निर्णय दिले. त्यामुळे ते आता सर्वांनी स्वीकारला पाहिजे. राजकारण आणि समाजकारणात कधी-कधी आमच्याकडून चुका होतात, कधी आमच्या सहकाऱ्यांकडून चुका होतात, असे त्यांनी म्हटले आहे.  तर "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत विचारले असता या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे निर्णय घेतील", असे छगन भुजबळ म्हटले आहे. 

Continues below advertisement

आणखी वाचा 

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची गच्छंती अटळ? फक्त एकाच गोष्टीचा फैसला बाकी, अजित पवार संध्याकाळपर्यंत महत्त्वाच्या नेत्यांना निर्णय कळवणार