Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : देशात विविध आंदोलने होत असताना, व्हीएस दहा टक्के आरक्षण मिळाले, आज नोकरी, शिक्षणमध्ये त्याचा देशभर फायदा मिळतो आहे. फडणवीस सरकारने व्हीएस आरक्षण आणि सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला सर्वाधिक लाभ मिळवून दिला आहे. मात्र ओबीसीचे (OBC) 1 टक्के आरक्षण ही जाऊ द्यायचे नाही, ही भाजपची भूमिका आहे. मराठा समाजाला ही न्याय देण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र काँग्रेसची भूमिका काय, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेस नेत्यांनी त्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे, एवढं मोठं आंदोलन सुरू असताना शरद पवार गप्प का आहे? आम्ही आमची भूमिका मांडली आहे की, मराठ्यांना न्याय देताना ओबीसीवर अन्याय करू नका किंवा मराठ्यांवर ही अन्याय होऊ देऊ नका. काँग्रेस आणि मविआ ने आपली भूमिका स्पष्ट करावी. असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ओबीसीचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणे योग्य ठरणार नाही

काँग्रेस नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे. त्यांनी कधीच ओबीसींना न्याय दिलेले नाही. आज जर काँग्रेस खुला पाठिंबा जरांगेच्या आंदोलनाला देत असेल तर त्या आंदोलनाची भूमिका काय हे ही त्यांनी लक्षात घ्यावं? आधीच ओबीसीच्या 353 जातींना असलेले आरक्षण कमी आहे, अशात ओबीसीचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणे योग्य ठरणार नाही, ते अन्यायकारक होईल. अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मांडली आहे.

आमच्या सरकारची भूमिका राहिली आहे की, कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देऊ नये. ओबीसींचे आरक्षण मराठ्यांना देणे किंवा मराठ्यांचा आरक्षण ओबीसींना देणे योग्य ठरणार नाही. भाजप आणि आमचे सरकार सर्व समाजासोबत एकसारखेपणाने उभी आहे. काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जरांगेच्या आंदोलनाला समर्थन देतांना त्यांची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरसकट या शब्दाला आमचा विरोध; सरसकट होऊ शकत नाही- चंद्रशेखर बावनकुळे

या संदर्भात जे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये जेवढ्या ओबीसींकडे पिढ्यां पिढ्या आवश्यक डॉक्युमेंट्स आहे, मात्र त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नव्हते, त्यांना ओबीसीमध्ये घेण्यात आलं. अजूनही सर्वेक्षण सुरू आहे. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण सरसकट हा जो शब्द आहे, या शब्दाला आमचा विरोध आहे. सरसकट होऊ शकत नाही. संपूर्ण 353 जातीमध्ये आधीच आरक्षण कमी आहे. त्यामुळे असं सरसकट न मागता ज्यांच्याकडे आवश्यक दस्तावेज आहे, त्यांना ओबीसीचे आरक्षण दिले जाईल. त्याला कोणीही नाही म्हणत नाही. सर्वेक्षण सुरूच आहे. असेही ते म्हणाले.

टीका करण्यापेक्षा राजकीय भूमिका घ्या- चंद्रशेखर बावनकुळे

विरोधकांचे न बोलणे म्हणजे काय? न बोलण्याचे अर्थ महाराष्ट्र समजतो. इतर सर्व मुद्द्यांवर तर तुम्ही बोलता मग ही चुप्पी कशासाठी आहे? मनोज जरांगेच्या आंदोलनाबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. तुमची भूमिका राज्याला कळली पाहिजे. ओबीसींना, मराठ्यांना तुमची भूमिका कळली पाहिजे. शरद पवार आणि काँग्रेसची भूमिका काय हे कळलं पाहिजे. टीका करण्यापेक्षा राजकीय भूमिका घ्या, मात्र ते भूमिका घेत नाही आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या परवानगी वाढवण्याची मागणी संदर्भात बोलायचं झालं तर हि उच्च न्यायालय आणि आंदोलकांमधील बाब आहे. त्यामध्ये मी बोलणार नाही. आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालयाचे अधिकार उच्च न्यायालयाला आहे. त्यामध्ये आम्ही बोलणे योग्य नाही. त्याबद्दल उच्च न्यायालय निर्णय घेईल. असेही बावनकुळे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

संबंधित बातमी: