Raj Thackeray and Uddhav Thackeray Mumbai Election 2026: मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली. मुंबईत भाजपचे नेते आशिष शेलार, अमित साटम, शायना एन सी या बड्या नेत्यांनी सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंवर थेट हल्ला चढवला. अकार्यक्षम ठाकरे बंधू हे मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर असल्याचे त्यांनी म्हटले. (BMC Election 2026)

Continues below advertisement

आम्ही मराठीच आहोत, मुंबईकर आमच्यासोबत आहेत. आम्ही ठाकरे बंधूंना बुद्धीबळाच्या पटावर चितपट करु. या भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे बंधुंना धडा शिकवण्याची गरज आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. मुंबईकरांनी विकासाच्या बाजूने मतदान करावे. मुंबईचं ठरलं आहे, गतिरोध होणाऱ्या ठाकरे बंधूंना विरोध करायचा. राज ठाकरे यांनी 2014 सालीही असेच आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या हाती फार काही लागले नव्हते. राज ठाकरे यांना त्यांचा पराभव होणार हे माहिती आहे. त्यामुळे ते आता पाडू मशीनसारखे तकलादू मुद्दे समोर आणत आहेत, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली. 

तर मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी मतदान केल्यानंतर भाजपसमोर आव्हान उभ्या करणाऱ्या ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. आज मुंबईकर विकसित मुंबईसाठी मतदान करतील.  काल ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. पण कोरोना काळात हेच मंदिर बंद करण्यात आले होते. राज ठाकरे पाडू मशीनबद्दल बोलत आहेत. याचा अर्थ निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काय बोलायचे याची वातावरणनिर्मिती करताना ते पाहायला मिळत आहेत. भाजप पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री या सगळ्यांचा पाठिंबा माझ्यासोबत आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आहे, असे अमित साटम यांनी म्हटले.

Continues below advertisement

BMC Election 2026 Election Commission: मुंबईत निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत... मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)

अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. केवळ रांगेच चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

आणखी वाचा

आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...