BMC Election 2026:मुंबई - महापालिका मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महापालिकेच्या रणधुमाळीत आपल्या आवडत्या पक्षाला, नेत्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार प्रचारात उभारलेले दिसले. पक्षाची माळ गळ्यात घातलेल्या कलाकारांचे अनेक video सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत असताना आता एक मराठी अभिनेत्रीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देणारी एक पोस्ट केलीय. ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. कालच तिने भ्रष्ट हातात पालिका देऊ नका अशी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ती चर्चेत होती. दरम्यान
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असते. सामाजिक, राजकीय घडामोडींवर ती कायम तिचं स्पष्ट मत व्यक्त करताना दिसते. महापालिका निवडणुकीला उगी काही तास शिल्लक असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांचा फोटो शेअर करत त्यांना पाठिंबा दर्शवलाय. या पोस्टचे सध्या एकच चर्चा आहे.
काय केलीय तेजस्विनीने पोस्ट?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 20 वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धवसेना-मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत होत आहे. राज्यातील सर्व महापालिकांसाठी आज 15 जानेवारी 2026 मतदान पार पडणार आहे. मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांची नजर असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठिंबा देणारी पोस्ट केली आहे. ' मोठी लढाई लढू. मातीसाठी रं गड्या .. मनगटाचा जोर लावून .. तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावजी...' या गाण्याच्या ओळी कॅप्शन मध्ये लिहीत तेजस्विनीने राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे.
भ्रष्ट माणसाच्या हातात पालिका देऊ नका
कालच तिने भ्रष्ट हातात पालिका देऊ नका अशी एक पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिले," आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी नगरसेवक असतात.म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका.सतर्क रहा.योग्य,सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्या." असं तिने लिहिलंय.यासोबत तिने एक व्हिडिओ आपला instagram वर रि-शेअर केलाय. राज्यातील २९ महानगरपालिकांतील एकूण २,८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जवळपास नऊ वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या महानगरपालिका निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरल्या आहेत.