ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Thane Lok Sabha 2024) ठाणे मतदार संघातून (Thane Lok Sabha Constituency) महायुतीतर्फे शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना तिकिट मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यामध्ये नाराजीनामा नाटय सुरु झाले आहे. नवी मुंबई आणि मिरा भाईंदरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर हे लोण ठाण्यातही पोहचलं आहे. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजुत काढल्याने तूर्तास हे नाराजी नाम्याचे वादळ शमले असतानाच घोडबंदर पट्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवाराने कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढवण्याची मागणी केली.
नरेश म्हस्केंच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नरेश म्हस्के यांची ठाणे लोकसभेची लढत अडचणीची ठरणार आहे. महायुतीतून भाजपची नरेश म्हस्के यांची उमेदवारी नामंजूर ठरवण्यात आहे.
म्हस्केंच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे
ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई येथे नरेश म्हस्के भाजपच्या गणेश नाईक यांची भेट घेण्याकरिता गेले असताना त्यावेळी देखील तिथे काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हस्केंना विरोध केला. यानंतर म्हस्केंनी ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपा आमदार संजय केळकर आणि काही पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पाडली. भारतीय जनता पार्टीची प्रथा परंपरा आहे, कोणतीही विशेष निवडणूक असल्यावर बैठक बोलावली जाते. इतर वेळेला नियमित बैठक होते असते.
ठाण्याच्या जागावाटपावरून भाजप कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य
दरम्यान, या बैठकीनंतरच्या काही तासातच ठाणे लोकसभेच्या ओवळा माजीवाडा क्षेत्रातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावे, यासाठी या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळेच महायुतीत भाजपचा नरेश म्हस्केंना कडाडून विरोध असल्याचे दिसून येत आहे. नरेश म्हस्के हे उद्या ठाणे लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरिता देखील जाणार आहेत. मात्र, नरेश म्हस्के यांना भाजप कार्यकर्त्यांचा होणारा विरोध पाहता, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
भारतीय जनता पक्षाचे ओवळा माजिवडा मंडळ अध्यक्ष ऍड हेमंत म्हात्रे, सरचिटणीस सचिन शिनगारे, सरचिटणीस जितेंद्र मढवी, जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष राकेश जैन, दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संजोयक डॉ. अक्षय झोडगे, पॅनल प्रमुख महेश ताजने, वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉ. अपर्णा ताजने, उत्तर भारतीय सेलचे संजोयक हिरा प्रसाद राय, सुपर वारीयर, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख, तसेच ओवळा माजिवडा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज राजीनामे दिले.
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी
ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाचे चिन्हावर लढवली जावी, यासाठी राजीनामे देण्यात आले आहेत. ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खा. डॉ. संजीव नाईक आग्रही होते. त्यादृष्टीने त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजुन काढला होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्याने भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये रोष पसरून अनेकांनी राजिनामे दिले आहेत.