Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे. मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजपता जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पडला असून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर दिग्गज नेते उपस्थित होते.
निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं निमित्त साधत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर - पंतप्रधान मोदी
संपूर्ण देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतिक्षा असते. भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात आला आहे. जनतेला पुढील पाच वर्षांपर्यंत मोफत रेशन मिळेल. पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असंही पंतप्रधान मोदी यांनी संबोधन करताना सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा
- रोजगार आणि उद्योजकतेभर भर
- मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार
- आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, 70 वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार, तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार
- गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधणार
- पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवणार
- वीजबिलाचा शून्य करण्यासाठी काम करणार, कोट्यवधी कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करणार
- गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार
- कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार
- महिलांसक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर, 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिला बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षण देणार
- मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाखांवर, मुद्रा योजनेंतर्गत यापूर्वी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मला विश्वास आहे की इंडस्ट्री 4.0 च्या युगासाठी आवश्यक असलेली इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक नवीन शक्ती म्हणून याचा वापर केला जाईल.