अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक कामाला लागले आहेत. अशात राज्यातील काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या नावांची देखील वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणाऱ्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यंदा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहे. दरम्यान, याच चर्चांवर अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी निवडणुकीला सामोरे जात असताना सुज्ञ जनता मोदींच्याच पाठीशी उभा राहील" असे विखे म्हणाले आहेत. 


अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) त्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदारसंघात चाचपणी देखील सुरू झाली आहे. मात्र, सुजय विखे यांनी देखील जनतेचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचे सांगत प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी निवडणुकीला सामोरे जात असताना सुज्ञ जनता मोदींच्याच पाठीशी उभा राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा विश्वास व्यक्त करत असतांना खासदार विखे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर बोलणं टाळलं आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील एण्ट्रीच्या चर्चेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 


प्रकाश आंबेडकरांनी लवकर वेगळा निर्णय घ्यावा...


दरम्यान पुढे बोलतांना विखे म्हणाले की, "इंडिया आघाडीमध्ये फक्त आश्वासन दिली जात आहेत, हे ओळखून प्रकाश आंबेडकरांनी लवकर वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे असे सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना हवं तसं स्थान देऊ शकणार नाही. महाविकास आघाडीमध्ये केवळ आश्वासन दिली जात आहेत, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी लवकर वेगळा निर्णय घ्यायला असे देखील विखे म्हणाले आहेत.


महाविकास आघाडीवर टीका...


महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचं समोर येत आहे. याबाबत बोलताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला टोमणा लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही स्थान मिळणार नाही, कोणी कोणतीही जागा मागत आहे. कुणीही एकत्रित आलं तरी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


राज ठाकरे-एकनाथ शिंदे युती करणार? मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ