Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारी प्रकरणं  बाहेर काढल्यामुळे भाजपाचे आमदार सुरेश धस चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी बाहेर काढलेल्या प्रकरणांमुळे सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे असे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, आता या दोन्ह नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीदेखील शिक्कामोर्तब केले आहे. याच भेटीवर आता खुद्द सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना फाशी मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. 

Continues below advertisement


सुरेश धस यांनी नेमकं काय सांगितलं? 


सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त बैठक झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच गजहब उडाला आहे. त्यानंतर आता सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "धनंजय मुंडे याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या दिवशी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी लपून छपून नव्हे तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो. प्रकृतीच विचारपूस आणि लढा या दोन वेगळ्या बाबी आहेत," असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं.


प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे?


लढ्यामध्ये आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधातच राहणार आहोत. मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी केली. प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लढा आणि प्रकृतीची चौकशी करायला जाणे यात काहीही संबंध नाही. हा संबंध कृपया जोडू नये. आमच्यात कोणीही मध्यस्थी केलेली नाही, असेही धस यांनी सांगितले.  


मी धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप मागितलेला नाही


आमच्यात साडे चार तास भेट झालेली नाही. आमच्यात भेट झाल्यानंतर बाहेर येऊन मी काय केले, हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या काही दिवसांत मी आणखी काही सांगणार आहे, ते तुम्हाला समजेलच. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजूनही मागितलेले नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हे संपूर्णपणे अजित पवार यांच्या हातात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतचा लढा चालूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 



हेही वाचा :


Suresh Dhas meets Dhananjay Munde : मोठी बातमी : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्तभेट, खासगी रुग्णालयात नेमकं काय घडलं?


Dhananjay Deshmukh: सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीला कनिष्ठ लिपीकची नोकरी; धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नोकरी आधी... 


KDMC : डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! कल्याण डोंबिवलीत सिझेरियननंतर प्रचंड रक्तस्त्राव अन् महिलेचा जीव गेला, नातलगांच्या गोंधळानंतर पालिका प्रशासनाचं आश्वासन