कल्याण डोंबिवली: कल्याण डोंबिवली (kalyan dombivali) महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये पंचवीस वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी दोन दिवसांपासून अंत्यविधी करण्यात आला नाही. नातेवाईकांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र, पोलीस रुग्णालय प्रशासन राजकीय मंडळी यांच्यामध्ये एक दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई जे जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. मात्र, मयत महिला सुवर्णा सरोदेचे पती अविनाश सरोदे यांनी निर्णय घेतला आहे, जोपर्यंत शवविच्छेदनाचा रिपोर्ट येत नाही. तोपर्यंत मृतदेह जे.जे.रुग्णालयातच ठेवण्यात येईल, रिपोर्ट आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे, तर या प्रकरणी समिती गठीत करून दोषींवरती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले आहे.(kalyan dombivali)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार एक वैद्यकीय समिती जिल्हा शल्यचिकित यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत करून दोषींवरती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले आहेमहिलेचा सिजर इन सेक्शन झालं होतं. रात्री तिची तब्येत बिघडल्यामुळे पुन्हा ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेले. रक्तस्राव होत असल्यामुळे तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यावेळी डॉक्टर निलेश शिरोडकर त्यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय स्तरावर समिती गठीत करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. (kalyan dombivali)
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीतील (kalyan dombivali) रहिवासी असलेल्या महिलेला 11 तारखेला डिलिव्हरीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 तारखेला त्यांना प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. जिथे त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, डिलिव्हरीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्यानंतर तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिचे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. सिझेरियन नंतर महिलेचा रक्तदाब वाढून तिची तब्येत ढासळल्याने तिच्यावर पुन्हा सर्जरी करण्यात आली, त्यात तिचे गर्भाशय काढण्यात आले. त्यानंतर तिला वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. गर्भाशय काढण्याचा निर्णय तिचा जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.