शिर्डी : भाजपचे महाअधिवेशन (BJP Maha Adhiveshan) आज साईंच्या शिर्डीत (Shirdi) पार पडत आहे. या महाअधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या अधिवेशनाची ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadnavis) अजोड कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या महाविजय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाजपच्या महाअधिवेशनातील या नव्या टॅगलाईनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 


विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या महाराष्ट्रात काही ठिकाणी सभा घेतल्या. त्यात त्यांनी 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 'एक हैं तो सेफ है'चा नारा दिला होता. या दोन्ही घोषणांची निवडणुकीत जोरदार चर्चा रंगली होती. आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात भाजपचे 15 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  






'श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी'


या महाअधिवेशनाच्या टॅगलाईनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 'श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची अजोड कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट ते विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या  मुख्यमंत्रिपदाची दुसरी इनिंग सुरु झाल्यानंतर हे अधिवेशन पार पडत असल्याने या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ramdas Kadam : उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंना कुठं ठेवायचं हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखावं, रामदास कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल


Ravindra Chavan : मोठी बातमी : भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड