ठाणे : राज्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत, मात्र आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) सर्वकाही आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंही कौतुक केलं आहे. ठाण्यात महायुतीच्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गणेश नाईक यांनी भाषणात म्हटलं की, अभिजित पानसे यांना मागे टाकले, योग्य वेळी ते पुढे येणार. ठाणे जिल्हा 33 टक्के असा मतदार आहेत. छोट्या चुका मोठया लोकांकडून कधी-कधी होत असतात, मात्र तुम्ही व्यवस्थित, काळजीपूर्वक मतदान करा.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण आमच्यासाठी फडणवीसच लीडर
राज्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, मात्र आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच सर्वकाही आहेत. एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. मनसे शिस्त बद्द पक्ष आहे. डोलारा किती मोठा, त्यापेक्षा शिस्त बद्द पार्टी आहे. जल्लोष करण्यासाठी आपण पुन्हा भेटू, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
काय म्हणाले गणेश नाईक?
मला विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवू. आता माननीय मुख्यमंत्री आहेत, पण आमच्या दृष्टीकोनातून देवेंद्र फडणवीस हे आमचे लीडर आहेत. मी तर ओपन बोलतो, प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, पण पक्षाच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असं नाईक यांनी म्हटलं आहे.
निरंजन सारखा तरुण तडफदार आपला उमेदवार : फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी संबोधित करताना म्हटलं की, निरंजन सारखा तरुण तडफदार आपला उमेदवार आहे. गेल्या 12 वर्षात त्यांनी खूप काम केलं, ज्याप्रमाणे ते आपला संपर्क ठेवतात ते महत्त्वाचे आहे. पदवीधरांची प्रश्न त्यांनी मांडले तर जनसामान्यांचे प्रश्न देखील त्यांनी मांडले, त्यामुळे सभागृहातील जागरूक सदस्य म्हणून त्यांना बघितलं जातं.
भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Padvidhar matadar sangh) माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी 'सशर्त' पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :