Chandrashekhar bawankule: विरोधकांना परिणाम भोगावे लागतील, जनता निवडणुकीत त्यांना जागा दाखवेल, असा टोला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यश चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते आज वसई विरार दौऱ्यावर होते. त्याआधी पञकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यावर आपलं मत मांडलं. औरंगजेब जी बद्दल बोलताना, बावनकुळे यांनी, माझी कालची पूर्ण पञकार परिषद बघितली तरी जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेब क्रू कर्मा नाही, असं म्हटल्यावर मी औरंगजेब कसा क्रू कर्मा होता, ते मांडल आहे. औरंगजेबाच्या विचाराला उध्दवस्त करण्याची भूमिका आमची आहे. काल हिंदी पञकारांनी प्रश्न विचारला की, राजे राजे म्हणणा-यावर जितेंद्र आव्हाडांनी कारवाईची मागणी केली आहे.  त्यावर उत्तर देताना, मी हास्यस्मित करत, राजे राजे म्हणना-यावर कारवाई करा, अशी मागणी करताय आणि तिकडं औरंगजेब जी करता असा आपण म्हटल्याच बावनकुळे यांनी सांगून, त्यांच्या शब्दाचा काही मिडियाने विपरयास केल्याच म्हटलं आहे. 


संजय राऊतांना टोला -
संजय राउत याच्या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, राऊत यांची मानसिकता टोमणे मारायची आहे.  दिवसभर मिडियाचा स्पेस घेवून, टोमने मारायची राहिली आहे.  राऊत यांनी माझी संपूर्ण पञकार परिषद ऐकली पाहिजे होती. 


जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल -
विरोधकांनी काहीही म्हटल्यावर आम्ही बावू करत नाही. माञ छञपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हेत हे ठाम पणे अजित पवार बोलतायत. ही हेकेखोरी बरी नाही. पुढच्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. असं थेट मत बावनकुळे यांनी यावेळी मांडलं.  स्वराजरक्षक छञपती होते. माञ छञपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे बोलायला नाही पाहिजे, असेही ते म्हणाले. 






विरोधी पक्षांनी  डेव्हलेपमेंटची भाषा बोलली पाहिजे -


छगन भुजबळाच्या जानता राजा संदर्भात बोलताना,  संपूर्ण जगात एकच राजा आहे जो जानता राजा शिवछञपती शिवाजी महाराज आहे. राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील, याचे परिणाम तुम्हाला निवडणुकीत दिसतील असं बावनकुळे यांनी म्हलं आहे.  खरंतर विरोधी पक्षांनी  डेव्हलेपमेंटची भाषा बोलली पाहिजे, अशी सत्ताधारी पक्षाची अपेक्षा आहे.  त्यांनी नेहमी  विकासाबद्दल बोललं पाहिजे,  माञ विरोधक विविध मुद्दे काढत असल्याचा आरोप केला आहे. टोमणे मारण्यापेक्षा विकास कामाबद्दल बोला असं राउत यांना बावनकुळे यांनी सुचवलं आहे.  विरोधी पक्षाने आता विरोधी भूमिकेत यावं. विद्याक मुद्दयावर बोलावं,  असं ही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.   


दरम्यान, शाहरुख खान याच्या पठाण चिञपटाविषयी बोलताना जर गाण्यावर कुणाचा आक्षेप असेल तर सेन्सर बोर्डाकडे जावं, ते आक्षेपार्ह गाणं काढून टाकतील असं मोघमं म्हटलं आहे.