Suresh Dhas : परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. मात्र, भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर लॉन्ग मार्च नाशिक (Nashik) येथे स्थगित करण्यात आला. मात्र, यावेळी सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले होते. यावरून विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार तोफ डागली असून आता भीम आर्मीने सुरेश धस यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. 


सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी वक्तव्य केले की, सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांना मारले, त्यांना एक संधी द्या, त्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू नका. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. 


सुरेश धसांवर ॲट्रॉसिटी दाखल करा


या आमदाराने आमचा लॉन्ग मार्च चिरडण्याचं काम केलं आहे, एक षड्यंत्र केलेले आहे. यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे सुरेश धस यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सुरेश धस तुम्ही ज्या ठिकाणी भेटाल, त्या ठिकाणी तुम्हाला आंबेडकरी समाज सोडणार नाही. सुरेश धस महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही, असा इशारा देखील अशोक कांबळे यांनी दिला आहे. 


जितेंद्र आव्हाडांची सुरेश धसांवर टीका 


दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला आहे. त्यात तिसर्‍या माणसाने "जाऊ द्या, त्याला माफ करा", असे बोलणे योग्य नाही आणि तसे बोलणं खूप सोपे असते. मात्र पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर त्या आईला काय वाटत असेल, याचा जरा विचार बोलण्याआधी करायला हवा होता. सगळ्याच ठिकाणी राजकारण करू नये, आपली पोळी भाजण्याची सवय चांगली नाही. पण हा ज्याचा-त्याचा विचार आहे. मात्र या प्रकरणात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना शिक्षा होणारच, याची खात्री आम्ही देतो. धस यांच्याकडे क्षमायाचनेचे भाव असतील तर त्यांनी साधूसंत व्हावे आणि हिमालयात जावे. तसेच वाल्मिक कराडलाही माफ करावे, अस हल्लाबोल त्यांनी सुरेश धस यांच्यावर केलाय.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal : दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल


सुरेश धसांची दुटप्पी भूमिका भाजपच त्यांच्याकडून वदवून घेतंय अशी शंका, अंजली दमानियांची धसांवर टीका, म्हणाल्या..