सिंधुदुर्ग :   बीडमध्ये (Beed)  काही दिवसांपूर्वी पोलीस भरती झाली. EWS अंतर्गत झालेल्या भरतीमध्ये सगळी मुस्लिम मुलं आहेत.  हे घातक आहे, असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.  नितेश राणेंनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगेवर देखील निशाणा साधला आहे. मोहम्मद जिन्नाने हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडली तीच भूमिका जरांगे पाटील घेत असतील तर आमचा विरोध आहे, असे देखील नितेश राणे म्हणाले.ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते


नितेश राणे म्हणाले,  दोन दिवसांपूर्वी मी जरांगे पाटील यांना मोहम्मद अली जिना यांची उपमा दिली.   तेव्हा महाविकास आघाडीतील आणि त्याला समर्थन करणाऱ्या ब्रिगेडी लोकांना फार झोंबले आम्ही पहिल्या दिवसा पासून एकच बोलत आहोत आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे.  आज जरांगे पाटील यांची भाषा एका राजकीय नेत्यांची आहे,  ते फक्त भाजपावर टीका करत आहेत महाविकास आघाडीवर बोलत नाहीत. 


शांतता रॅली मुस्लमान समाजाने हायजॅक केली का? नितेश राणेंचा सवाल


मोहम्मह जिन्नाने हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडली तीच भूमिका जरांगे पाटील घेत असतील तर आमचा विरोध आहे.   मराठा समाजाच्या हिताचे बोलाल तर समर्थन देऊ मात्र राजकीय बोललं तर विरोधच असेल. माझ्याकडे EWS अंतर्गत पोलीस bharti ची यादी आहे.  हे घातक आहे बीड मध्ये झालेल्या पोलीस भरतीत सगळे मुस्लिम मुलं आहेत. तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठ्यांना होत नाही. यांच्या शांतता रॅलीत जावेद भाई शेख पाणी वाटत आहे. यांची शांतता रॅली मुस्लमान समाजाने हायजॅक केली आहे का? यांच्या शांतता रॅलीत मराठा किती आहेत ते तपासला पाहिजे, असे देखील नितेश राणे म्हणाले.


आम्हाला विरोध करणारे मराठा समाजाचे नाहीत : नितेश राणे


नितेश राणे म्हणाले,  आम्हाला विरोध करणारे मराठा समाजाचे नाहीत.  मराठा समाजाने हे लक्षात घ्यावे अन्यथा हे ओबीसी आणि मराठा वादात गुंतून ठेवतील . जे आम्हाला साडेसातनंतर फोन करत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं तुमच्या नेत्यांचे देखील फोन नंबर आमच्याकडे आहेत.एक तुम्ही एक फोन कराल तुमच्या नेत्यांना  आमचे चार फोन जातील. मराठा आरक्षणावरून सुरु झालेलं आंदोलन आता पाडापाडीवर गेलं आहे. समाजावर बोला राजकारण नको  जर भाषा राजकीय आणि निवडणुकीची असेल तर निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिली जाईल .


मुस्लमान समाजाला राऊत आणि उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे : नितेश राणे


मातोश्रीबाहेर आलेले मुस्लमान शिंदेची माणसं होती.  हा बाळासाहेबांचा झाला नाही तो त्यांचा काय होणार आहे. वक्फ बोर्डाच्या वेळी पळ का काढला याच  उत्तर मुस्लमान समाजाला राऊत आणि उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असे नितेश राणे म्हणाले.


वसुलीचा बादशाह मातोश्रीवर तिसऱ्या माळ्यावर : नितेश राणे


नितेश राणे म्हणाले,  वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे.  वसुलीचा बादशाह मातोश्रीवर तिसऱ्या माळ्यावर बसला आहे.  आम्हाला पण तमाशाच्या शो ची तिकीट पाहिजे राऊत तमाशा वालाच आहे.  


पवार साहेबांनी नेमकी भूमिका काय ते स्पष्ट करावे:  नितेश राणे 


मराठा समजाला उत्तर द्यावं लागेल त्यांनी उत्तर देण्याची हिंमत  दाखवावी. पवार साहेबांनी एकदा तुकडा पाडावा ओबीसीतून नको स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशी भूमिका मांडावी. पवार साहेबांनी नेमकी भूमिका काय ते स्पष्ट करावे दरवाजावर आले आहेत त्यांना  स्पष्ट उत्तर द्या, असे देखील नितेश राणे म्हणाले.