Beed Loksabha Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीबाबतचा 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इससाईट्स'चा एक्झिट पोल समोर आलाय. महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतीबाबतही अंदाज समोर आले आहेत. बीडमध्ये भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांना आघाडी मिळणार असल्याचा अंदाज या एक्झिटपोलमधून व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे या मतदारसंघातून पिछाडीवर जात असल्याचा अंदाज आहे. 


मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला 


बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला पाहायला मिळाला होता. शिवाय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही मोठा प्रभाव या मतदारसंघात होता. मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय संघर्षही या मतदारसंघात वाढल्याचे पाहायला मिळाले होते. पीएम मोदींनी अंबाजोगाई येथे पंकजा मुंडे यांच्यासाठी सभा घेतली होती. दरम्यान, पीएम मोदी मुस्लीमांच्या विरोधात बोलतात, असा प्रचार बजरंग सोनवणे यांच्याकडून करण्यात आला होता.


धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या मदतीला धावले 


अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत आल्यानंतर धनंजय मुंडेनीही या निवडणुकीत पंकजा मुंडेंना साथ दिली होती. पंकजा मुंडेंचा प्रचार करताना धनंजय मुंडेंनी बजरंग सोनवणेंना चंदनाच्या मुद्द्यावरुन घेरले होते. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करा, असं आव्हानही धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना दिले होतं. त्यामुळे बीडची लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.


राज्यात सर्वाधिक मतदान बीड जिल्ह्यात झाले..


राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झालं. यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता सुमारे 70.92  टक्के मतदान  झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक 70.92 एवढ्या  मतदान झालं असल्याची नोंद समोर येते आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात उन्हामुळे राज्यात ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला असताना चवथ्या टप्यात मतदान करणाऱ्या बीडकरांनी मात्र उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानाला न जुमानता रेकॉर्ड ब्रेक 70.91टक्के  मतदान करून  आपलं वेगळेपण जपले आहे . सर्वाधिक बीडमध्ये 70.91टक्के तर नंदुरबार मधे 70.68टक्के मतदानाची नोंद झाली आहे.


 Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Exit Poll 2024: महाराष्ट्रात धक्कादायक निकाल? मविआला 25, महायुतीला 22 अन् एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज