Bageshwar Maharaj : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या बागेश्वर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमात्मा एक सेवकांचे जुमदेव बाबा आणि परमात्मा एक सेवकांबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य बागेश्वर महाराजांनी केलं होतं. या प्रकरणी आता बागेश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक करावी,अशी मागणी करत जुमदेव बाबांचे हजारो सेवक मोहाडी पोलीस ठाण्यात पोहचल आहेत. 


'295 अ'नुसार गुन्हा दाखल


सेवकांच्या भावना दुखावल्याने बागेश्वर महाराजांविरुद्ध भंडाऱ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात अखेर 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती बागेश्वर महाराजांना अटक करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवकांना दिलं. दरम्यान, आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या असंख्य सेवक आणि कार्यकर्त्यांसह मोहाडीत पोहचत असताना पोलिसांनी त्यांना वाटेत थांबवून ताब्यात घेतलं. दरम्यान, संतप्त सेवकांनी पोलीस ठण्यासमोर ठाण मांडला असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 






बागेश्वर महाराज जुमदेव बाबांबद्दल काय काय म्हणाले?


नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात एक वेगळा संप्रदाय आहे. ते हनुमानाला मानतात. मात्र, हनुमानाची पूजा करणे त्यांना चालत नाही. श्राद्ध घालू नये, आई-वडिलांचे फोटो ठेऊ नयेत. राम राम नाही तर जय गुरुदेव म्हणा. ज्या हनुमानाने नेहमी राम रामचा जप केला. त्याचे उपासक राम राम म्हणणार नाहीत. ही तर हद्दच आहे. रसगुल्ला खायचा आणि शुगर असल्याचे सांगायचे, असा हा प्रकार आहे, असं बागेश्वर महाराजांनी म्हटलं होतं. यानंतर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल केलाय. 












इतर महत्वाच्या बातम्या 


संजय राऊत जिथे प्रचाराला जातात तिथे अपयश येतंच, लंकेंच्या जनसंवाद यात्रेला आल्यास नगरचा निकाल उद्याच लागणार; भाजपची टीका