Atishi Marlena Delhi CM : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज आपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरवण्यात आलाय. आतिशी मारलेना या दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी काँग्रेसकडून शिला दिक्षीत दिल्लीच्या 3 वेळेस मुख्यमंत्री झाल्या होत्या. आतिशी मारलेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. 


दिल्लीचे सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रि‍पदासाठी आतिशी मारलेना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप आदमी पक्ष संपवण्याचा कट रचला होता, असा आरोपही यावेळी गोपाल राय यांनी केला आहे. आम आदमी पक्ष अजूनही एकजूट आहे, तो अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात ताकदीने काम करेल, असंही गोपाल राय म्हणाले. 


आतिशी मारलेना वयाच्या 43 व्या वर्षी मुख्यमंत्री बनणार आहेत


आतिशी मारलेना सध्याच्या घडीला भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी वयाच्या 43 व्या वर्षी मुख्यमंत्री बनणार आहेत. देशातील चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलायचे झाले तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. योगी आदित्यनाथ यांचं वय 52 आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचं वय 49 आहे, ते 5 व्या क्रमांकावर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वय 49 आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वय 73 आहे. सध्याच्या घडीला भारतातील सर्वात वयस्कर मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत, त्यांचं वय 79 आहे. 


अरविंद केजरीवाल नायब राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशिवाय दिल्लीच्या म्हणून आतिशी मारलेना सध्या भारतातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचं वय 69  आहे. याशिवाय दिल्लीतील महिला मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत. याआधी शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, मात्र या दोन्ही नेत्यांचे यापूर्वी निधन झाले आहे. आम आदमी पक्षाच्या मतानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी 4 वाजता नायब राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील. यानंतर आतिशी नायब राज्यपालांना भेटून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा सांगणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा