Ashok Chavan Resignation News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (Former Maharashtra CM Ashok Chavan resigns from Congress) दिला. आज ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सहा दशकानंतर काँग्रेसपासून फारकत घेतली. त्यांनी काँग्रेसला (Congress) रामराम केल्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जाऊ लागले. पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलेय. लोकमत वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी खंत बोलून दाखवली. काँग्रेसमध्ये काही चांगले बदल दिसत नव्हती. पक्षाच्या कारभारात समन्ययाचा पूर्ण अभाव होता. कुणाचे ऐकायचं नाही, मनाचे करायचं असे चालले होते. ना ताळमेळ होती, ना जिंकण्याची जिद्द होती. आणखी किती वर्ष वाट पाहायची ? किती कोंडी होऊ द्यायची? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 


नाना पोटोलेंवर टीकास्त्र -


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले. नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने कोणताही तयारी काँग्रेस पक्षाची दिसत नव्हती. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचं ऐकून पुढे जायचं असतं. पण कुणाचेही ऐकायचं नाही, मनाचं करायचं, असं सुरु होतं. लोकसभा निवडणूक कशी जिंकणार? असा प्रश्न माझ्यसह सर्वांना पडला होता. त्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती, राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते. आताची  वेळ रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची होती. लोकांच्या प्रश्नांना आवाज उठवण्याची होती.सगळ्या कार्यशैलीबाबत मी बोललो, सूचना केल्या, पण दखल घेतली नाही. शेवटी किती वाट पाहायची? कोणतेही टीम वर्क दिसत नव्हते. 


पक्ष का सोडला ?? 


सातत्याने सूचना करुनही काही बदल होत नव्हते. कोणतीही तयारी नाही. लोकसभा निवडणुका जवळ आल्या तरी पक्षाची तयारी दिसत नव्हती. आता आणखी काही सांगण्यात अर्थ नाही, असे मला वाटलं. पक्षात काही चांगले बदलच दिसत नव्हते. किती दिवस अशीच वाट पाहायची ? किती कोंडी होऊ द्यायची ? त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 


मोदींबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण ? 


अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. मोदींच्या उपलब्धी मान्य केल्याच पाहिजेत, असे ते म्हणाले. मोदी यांच्या काळात पायभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात आले. लोकाभिमुख योजना आणल्या हे आपण मान्यच करावे लागेल. काहींचे मतभेद असतील, पण विरोधासाठी विरोध करण्याला अर्थ नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.


आणखी वाचा :


मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार