Ashok Chavan on Majha Katta : "विधानसभेच निवडणूक आमच्यासाठी नॉर्मल नव्हती. काँग्रेसचा पूर्ण अटॅक माझ्यावर होता. रेवंत रेड्डी यांच्याकडे केवळ आणि केवळ भोकर विधानसभेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे दोन मंत्री मतदारसंघात बसून होते, प्रचंड पैसा होता. अशा पद्धतीने फोकस करुन आमच्यावर अॅटॅक झाला", असं भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत  होते. 


या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते : अशोक चव्हाण 


अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, मी निवडणूक लढली तेव्हा समीकरणं वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामावर होता. मी मतदारसंघात प्रचंड काम केललं आहे. पण फक्त काम चालतं असं नाही. सोशल मीडियावर होणार प्रचार, तिथे आपल्याबद्दल चालणार अपप्रचार तरुण वर्गाच्या आता वेगळ्या अपेक्षा असतात. ज्या मंडळींना मीच मोठं केलं, तेच या निवडणुकीत माझ्या विरोधात उभा होते. मला विरोधक नवखा नव्हता. मी पहिली निवडणूक लढलो त्यावेळी विरोधक विरोधी पक्षातले होते. या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते. 


जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या व्हायला पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या संधी मिळाला पाहिजेत : श्रीजया चव्हाण 


श्रीजया चव्हाण म्हणाल्या, मतदारसंघाचा भरपूर विकास झालेला आहे. पण मतदारसंघात नवीन काय घडवून आणू शकतो. त्यामुळे मला वाटलं, रोजगारासंदर्भात काहीतरी करायला हवं. शिक्षणासंदर्भात काहीतरी करायला हवं. मला शिक्षणावर जास्त लक्ष देऊ वाटतं. जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या व्हायला पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या संधी मिळाला पाहिजेत. या सर्व मुद्द्यावर मी मतदारसंघात जास्त प्रचार केला, असंही श्रीजया यांनी सांगितलं. 


मतदासंघातील लोक नाहीत, तर कुटुंबाचाही भाग आहेत


माझ्यावर भरपूर मोठी जबाबदारी आहे. मागील लोकसभेपासून गावोगावी फिरु लागलो. लोकांना भेटू लागलो. तेव्हापासून कळायला लागलं की, राजकारण काय आहे. आणि किती काळ आपल्या कुटुंबियांनी मतदारसंघातील लोकांसाठी दिलाय. लोकांकडून मला कनेक्ट जाणवला. ते मतदासंघातील लोक नाहीत, तर कुटुंबाचाही भाग आहेत, असंही श्रीजया चव्हाण यांनी नमूद केलं. 




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Eknath Khadse : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वैर नव्हतं, विरोधी पक्षात असल्याने भूमिका; एकनाथ खडसेंकडून दिलजमाई करण्याचे संकेत