अवघ्या 66 दिवसांमध्ये मिसिंग लिंक भगदाड पडल्यानंतर झालेल्या चौफेर टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा भाडे के टट्टू असा उल्लेख केला. त्यांनी ज्यांना कुत्रं विचारत नाहीत ते सोशल मीडियात पैसे घेऊन टीका करतात, असा आरोप केला. आता सीएम फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेवरून सोशल मीडियात पुन्हा हल्लाबोल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा फडणवीसांच्या वक्तव्यावरून अहंकार, फक्त आणि फक्त अहंकार दिसत असल्याचे म्हटलं आहे. दमानिया यांनी ट्विट करत मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असतांना, सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एका मुख्यमंत्र्यांना? असा सवाल केला आहे. हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात 'देखलुंगा' असा टोला त्यांनी लगावला आहे. 

Continues below advertisement

आता म्हणतात 'देखलुंगा' 

अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, अहंकार.. फक्त आणि फक्त अहंकार. मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात 'देखलुंगा'? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात 'देखलुंगा'. 

महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे!  

दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, वैफल्य, अहंकार, माज वैगरे वैगरे हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे! दरम्यान, सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर कुत्ते, भाडे के टट्टू आणि तत्सम अतिशय सभ्य आणि संसदीय शब्दांमध्ये मोठमोठ्याने दरडावून सांगितले की महाराष्ट्राची बदनामी करू नका. पहाटेचा शपथविधी किंवा ज्यांना चक्की पिसायला लागेल म्हणाले आणि ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना मांडीला मांडी लावून बसवून घेणारे कोण होते आणि त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान केला की सन्मान वाढवला हे त्याच सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड  सांगण्याचे कष्ट मुख्यमंत्री महोदय घेतील का? 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या