Anil Parab Resort In Dapoli: आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक कार्यालय येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात ही भेट घेतली असल्याचे सोमय्या यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
यावेळी मध्यमसनही बोलताना सोमय्या म्हणाले आहेत की, साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या संदर्भात आम्ही तीन वेळा दापोली पोलीस स्टेशन मध्ये तसेच पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केल्या. राज्य सरकारने रिसॉर्टचा एन ए अनधिकृत असून फ्रॉड सर्जरी करून प्राप्त करण्यात आला आहे, असा अहवाल दिला आहे. आम्ही दापोळीतील दोन रिसॉर्ट मालकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु साई रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अजून पर्यंत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे ताबडतोब याची दखल घेत तक्रार दाखल करावी आणि कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री आहेत, असा आरोप देखील यावेळी सोमय्या यांनी केले. ते म्हणाले की, अनिल परब आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये स्पर्धा दिसते की, अधिक खोट कोण बोलू शकतो. अनिल परब रोज ओरडतात की माझा रिसॉर्ट आणि रिपोर्टशी काही संबंध नाही. आज महाराष्ट्राचे महासंचालक यांना आम्ही एक पत्र दिलं आणि काही पुरावे दिले. त्यात अनिल परब सांगतात माझ्या पार्टनरने म्हणजे सदानंद कदम त्यांच्याकडून जागा विकत घेतल्याचा म्हटलं आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे भाऊ आहेत. मी काही कागदपत्र आज पोलिसांना दिलेली आहेत त्यामध्ये स्पष्ट आहे की, ही मालकी अनिल परबांचीच होती. परब साई रिसॉर्टचे आरोप फेटाळत आहेत, मात्र विभास साठे यांच्याकडून खरेदी केल्याचा पुरावा देखील आहे. त्यामुळे गैरव्यवहार करून हे बांधले, या विरोधात तक्रार केली. पोलीस महासंचालकांना चौकशी करून कारवाई करावीच लागेल, असं ते म्हणाले आहेत.
संबंधित बातमी:
उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा कलेक्शन एजंट अनिल परब, लवकरच अनिल देशमुख शेजारी जातील - किरीट सोमय्या