Shiv Sena Symbol : निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी (Election commission of India) आमची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कालच्या भाषणात ते कोणाचा माणूस आहेत हे स्पष्ट सांगितलं. त्यावरुन आणखी स्पष्टता आली आहे. आता त्याची स्वत:हून दखल संबंधित संस्था घेतील, असं शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत बोलत होते. शिवसेना कुणाची (Shiv Sena Thackeray vs Shinde) याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांनी ठाकरे गटाची भूमिका माध्यमांसमोर मांडली. 


अनिल देसाई म्हणाले, "केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आज तीन वाजता धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे आमच्यावतीने बाजू मांडतील. आमचं एकच म्हणणं आहे योग्य न्याय हवा. पक्षप्रमुख आणि कार्यकारणी यावर निर्णय द्यावा, असे आमचे दोन अर्ज द्यावे". 


शिंदेंच्या भाषणावरुन कोण कोणासोबत हे समजलं!


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी दावोसचा किस्सा सांगताना, आम्ही मोदींचीच माणसं आहोत असं म्हटलं. त्यांच्या भाषणावरुन कळालं ते कोणाचे आहेत. यावरून राजकीय संदर्भ समजला.  कोण कोणासोबत होतं हे लक्षात आलं. या सर्व वाक्यावरून समजतं की पक्षामध्ये डिस्प्यूट होतं का? हे पूर्वनियोजीत होतं का? याचा सुमोटो भारताच्या सर्व संस्था घेतील, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला. 


निवडणूक आयोगात सुनावणी


धनुष्यबाण कुणाचा याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होत आहे.  यापूर्वीच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा केला होता. तसेच शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, अशी मागणी सिब्बल यांनी केली होती.


शिंदे गटातील 7 जिल्हाप्रमुखांच्या शपथपत्रावरही आक्षेप नोंदवला होता. यात विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे.


शिंदे गटाचा युक्तिवाद


दरम्यान, याबाबत  10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत शिंदे गटाचे अॅड. महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदा आहे. आमच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याने शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता.


VIDEO : Anil Desai : मी कुणाचा माणूस हे काल शिंदेंनी सिद्ध केलं,आज निवडणूक आयोगात बाजू मांडल्यावर सिद्ध होईल